st bus  sakal
नागपूर

Nagpur News : एसटीची चाके थांबण्याची शक्यता

आजपासून मुंबईत उपोषण दोन दिवसानंतर आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - एसटी कामगारांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या सरकार विरोधात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सोमवारपासून मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू होणारे आंदोलन १३ सप्टेंबरनंतर राज्यभर पसरणार असून एसटीची चाके पुन्हा थांबण्याची शक्यता संघटनेकडून व्यक्त केली जात आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढ लागू करण्याचे कामगार करारान्वये मान्य करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची पूर्ण अंमलबजावणी अजूनही झाली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांपूर्वीच महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली. परंतु, हे संघटनेला मान्य नाही.

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता ४२ मिळावा, घरभाडे मिळावे, वार्षिक वेतनवाढीची रक्कम फरकासह मिळावी, सातवा वेतन आयोग लागू करावा या मुख्य मागण्यांसाठी उपोषण केले जाणार आहे. आता ११ सप्टेंबरला बेमुदत उपोषणाने आंदोलनाची सुरुवात होत आहे.

याची दखल न घेतल्यास १३ सप्टेंबरपासून जिल्हा पातळीवर बेमुदत उपोषण सुरू होणार असल्याचे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी सांगितले.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी २०२१ साली एसटीचा साडेपाच महिने संप चालला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT