Stabbed due to not calling for birthday 
नागपूर

‘तुने मुझे बर्थडे को क्यू नही बुलाया' असं म्हणत घातला वाद अन् मित्राच्या पोटात खुपसला चाकू

अनिल कांबळे

नागपूर : बर्थडेला बोलावले नाही म्हणून दोन मित्रांनी एकाला मारहाण केली आणि पोटात चाकू मारून जखमी केले. बॉबी मनोजसिंग रावत असे जखमीचे नाव आहे. तर साहील ऊर्फ नानू विनोद सारवान व शुभम उदयभान ठाकूर असे आरोपी मित्रांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉबी रावत (वय २५, रा. गणपतीनगर, मानकापूर) याचा मित्र राहुलचा १७ ऑगस्टला बर्थडे होता. बर्थडेला आरोपी साहील ऊर्फ नानू विनोद सारवान (वय २०, रा. म्हाडा क्वॉर्टर, झिंगाबाई टाकळी) याला बोलाविले नव्हते. त्याचा राग साहिलच्या मनात होता. यावरून आरोपी साहिल व आरोपी शुभम उदयभान ठाकूर (वय २५, रा. म्हाडा क्वॉर्टर, झिंगाबाई टाकळी) यांनी संगनमत केले आणि बर्थडेचा कार्यक्रम संपल्यानंतर घरी जात असताना रात्री १२.३० वाजताच्या सुमारास बॉबीला मानकापूर हद्दीतील झिंगाबाई टाकळीतील नेताजी सोसायटीचे बाजूला रस्त्यात अडवून हाथबुक्कीने मारहाण केली.

तसेच धारदार चाकू बॉबीच्या पोटात मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी फिर्यादी सतीश भास्करराव उपासे (वय ३९, रा. प्लॉट नं. १६, लक्ष्मीनगर, गोधनी रोड, नागपूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. जखमीवर मेयो हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे.

विवाहितेची आत्महत्या

मायग्रेनच्या त्रासाला कंटाळून ३० वर्षीय विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनिता राकेश पटेल (रा. प्रसाद सोसायटी, सोनेगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश पटेल यांचे १० वर्षांपूर्वी सुनिताशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. काही महिन्यांपासून सुनिताला मायग्रेनचा त्रास होत होता. तिच्यावर उपचार सुरू होता. परंतु, त्रास वाढतच गेला. त्रासाला कंटाळून सुनिताने रविवारी दुपारी बारा वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT