stalling of rte admission process academic year of student parents confuse Sakal
नागपूर

RTE Admission : पालकांची वाढली चिंता; RTE प्रवेशाचा मुहूर्त निघेना, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस काेण जबाबदार

Student Career : राज्यातील बहुतांश शाळा सुरू झाल्या असून अनेक शाळांनी आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : राज्यातील बहुतांश शाळा सुरू झाल्या असून अनेक शाळांनी आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेत आरटीईच्या प्रवेशाची प्रक्रिया रखडल्याने पालकांची चिंता वाढली असून शाळा सुरू होऊनही आरटीई प्रवेशाची प्रक्रिया रखडलेलीच असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालक संघटनांनी केला आहे.

वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना उत्तम दर्जेच्या शाळेत शिक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायदा सुरू केला. या कायद्यांतर्गत शासकीय, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा आरक्षित ठेवली जाते.

या जागांसाठी दरवर्षी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, यंदाच्या वर्षी आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने नवे बदल केले होते. या नव्या नियमावलीमुळे गरीब, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळणे कठीण झाले होते.

परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिल्याने विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने पूर्वीच्या नियमावलीनुसार १७ मे ते ४ जून या कालावधीत आरटीई प्रवेशासाठी अर्ज मागविले होते.

परंतु खासगी शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रीया पूर्ण केली असून आता २५ टक्के जागावरील प्रवेश द्यायचा कसा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे.

विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार न करता सरकारने नवे नियम आणले. त्यामुळे हे प्रकरण आता न्यायालयात गेले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय खासगी शाळा हे त्यांचीच मनमानी चालवत आहेत. त्यांना आरटीई कायदाच नको असल्याचे दिसून येत आहे.

- राकेश तलमले, पालक संघटना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 3rd ODI: न्यूझीलंडने पहिल्यांदा भेदला भारताचा अभेद्य किल्ला! इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल, विराट कोहलीचं शतक व्यर्थ

ZP Election Mangalwedha : नगरपालिका पराभवानंतर भाजपची सावध खेळी; जिल्हा परिषदेसाठी आवताडे–परिचारक गटात समझोता?

IND vs NZ 3rd ODI: 'चेस मास्टर' विराट कोहली लढला अन् विश्वविक्रमी सेंच्युरीही ठोकली; मालिका विजयासाठी भारताच्या आशा जिवंत

Mumbai Firing Incident : मोठी बातमी! मुंबईत गोळीबाराची घटना, सोसायटीवर फायरींग करत आरोपी फरार

Pune Political Shift : शरद बुट्टेपाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार; उत्तर पुण्यात भाजपला मोठा धक्का!

SCROLL FOR NEXT