{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1613140616671,"A":[{"A?":"I","A":44.41193540666483,"B":763.8902908499426,"D":168.84501540452777,"C":50.669306829664706,"a":{"B":{"A":{"A":"MAERmwaurnI","B":1}," 
नागपूर

इंधनावरचा ३८ रुपयांचा कर राज्याने कमी करावा: माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी 

राजेश चरपे

नागपूर ः इंधन दरवाढीसाठी केंद्रावर आरोप करण्यापेक्षा राज्य शासनाने प्रतिलिटर ३८ रुपये आकारला जाणारा कर कमी करावा आणि जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी आणि इंधनाचे दर कमी करून घ्यावे असाही सल्ला त्यांनी पत्रकार परिषदेत केला. पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची ओरड चालली आहे. काही झाले तर केंद्राकडे बोट'दाखवायचे आणि स्वतःची सुटका करून घ्यायची असाच खेळ वर्षभरापासून सुरू आहे.

महाआघाडी सरकारन १३ महिन्यात जनहित विरोधी अनेक निर्णय घेतले. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी इंधना दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मुघलशाही धोरण स्वीकारले आहे. वीज बिल माफ करून कनेक्शन तोडणे बंद न केल्यास सरकारला कारभार चालवणे मुश्कली केला जाईल, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

वीज खंडित  केली जाऊ देणार नाही 

शेतकरी व गरिबांचे ७५ लाख वीज कनेक्शन तोडून चार कोटी जनतेवर अन्याय करण्याचे करण्यात येत आहे. हे कदापिही होऊ दिले जाणार नाही. वीज कनेक्शन तोडल्यास पुढचा हंगाम वाया जाईल. शेतकरी आधीच उध्वस्त झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात वीज कंपन्यांना विशेष अनुदान दिले होते. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीतील अंतर्गत लढाईमुळे गरिबांना वेठीस धरण्यात येत असल्याचे बावनकुळे म्हणाले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : इशान किशन, अभिषेक शर्मा यांचा SRH कडून IPL 2026 खेळण्यास नकार? काव्या मारनचा नोंदवला निषेध... जाणून घ्या सत्य

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : ऑनलाइन शॉपिंग पडली महागात ! महिलेची 98000ची फसवणूक

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

SCROLL FOR NEXT