file photo 
नागपूर

जाहीर केलेला आदर्श पुरस्कार थांबविला, जि. प.वर नामुष्की

नीलेश डोये

नागपूर : आदर्श शिक्षक पुरस्कारावरून जिल्हा परिषदेची राज्यभर चर्चा आहे. कारणही तसेच आहे. जिल्हा परिषदेने शासनाने नियम धाब्यावर बसवून विभागीय चौकशी सुरू असलेल्या एका शिक्षकाला हा पुरस्कार जाहीर केला. आता दिलेला पुरस्कार थांबविण्याची नामुष्की ओढवली आहे. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमुळे आदर्श पुरस्काराला गालबोट लागल्याची चर्चा होत आहे.

दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने जि. प. शाळांमधील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. प्राथमिक गटातून १३ व माध्यमिक गटातून २ अशा १५ शिक्षकांना पुरस्काराने दिली जातो. यंदाही या पुरस्कारासाठी जि. प.च्या शिक्षण विभागाकडे एकूण ३९ प्रस्ताव आले होते. यापैकी ३६ प्राथमिकसाठी तर ३ माध्यमिक गटासाठी आले होते. आदर्श पुरस्कारासाठी शिक्षकाची निवड करताना काही निकष आहेत.

यात गैरव्यवहाराच्या आरोपासोबत विभागीय चौकशी सुरू नसणे महत्त्वाचे आहे. परंतु, या निकषाला डावलून विभागीय चौकशी सुरू असलेल्या एका शिक्षकाची आदर्श पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेने निवड केली. काही पात्र शिक्षकांना डावलल्याचीही ओरड होत असल्याने निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. शिक्षण सभापती पाटील यांनी कोणत्या प्रकारची नियमबाह्य निवड झाली नसल्याचा दावा केला होता. परंतु, त्यांचा दावा फोल ठरला आहे. त्यामुळे आता संबंधित शिक्षकाला जाहीर करण्यात आलेला पुरस्कार थांबिवण्यात आला आहे.

फाइल विभागीय आयुक्तांकडे
विभागीय चौकशी सुरू असलेल्या शिक्षकाची निवड आदर्श पुरस्कारासाठी करण्यात आल्याचे लक्षात आल्याने त्यांचा पुरस्कार थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. फाइल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आली. त्यांच्याकडून निर्णय आल्यानंतर दुसऱ्याची निवड करायची की नाही, याबाबत विचार करण्यात येईल.
-रश्मी बर्वे, अध्यक्ष, जिल्हा परिषद


शिक्षकाची भावनिक पोस्ट व्हायरल
पुरस्कार थांबविण्यात आलेल्या शिक्षकाची भावनिक पोस्ट व्हायरल झाली आहे. यात त्यांनी आपले स्पष्टीकरण देत पुरस्कार सन्मानाने परत करण्याची तयारी दर्शविली. अध्यक्ष यांना तसे पत्र दिले. २०१९ ला काही त्रुटी असलेल्या शिक्षकाला पुरस्कार मिळाल्याचे मित्रांनी सांगितल्याने आपण प्रस्ताव सादर केल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment: शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! व्यवस्थापनाच्या वादामुळे रखडलेली शिक्षक भरती आता थेट होणार; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा..

Rahul Dravid Son Samit Dravid: राहुल द्रविडच्या मुलाने मैदानात घातला धुमाकूळ; 360° फटकेबाजीचा VIDEO व्हायरल

Land Acquisition: २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा! भरपाईवाढीच्या दाव्यांवर सहा महिन्यांत निर्णयाचे उच्च न्यायालयाचे आदेश

Amboli Waterfall : 'प्रति महाबळेश्वर' आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित! फेसाळणारे पाणी अन् दाट धुक्याचा थरार अनुभवण्यासाठी गर्दी; गोवा-कर्नाटकातूनही पर्यटकांची पावले वळली

Sillod News: सिल्लोडमध्ये खळबळ! डोंगरावर केमिकलच्या टाक्या टाकून पेटवल्या; उग्र वासाने नागरिकांमध्ये भीती, धोक्याची शक्यता..

SCROLL FOR NEXT