नागपूर

माणुसकीची किंमत शून्य; मृतदेहाची पाच लाख, नातेवाईकांच्या विनवणीडे डॉक्टरांचे दुर्लक्ष

गजानन बोरकर

कामठी (जि. नागपूर) : कामठी कळमना मार्गावरील खुशबू मोटारसमोरील लाईफलाईन या खाजगी कोविड सेंटर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णाच्या बिलावरून नातेवाईक व डॉक्टरांमध्ये झालेल्या वादातून तणाव निर्माण झाला. मृतदेह मिळण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी सायंकाळी कामठी कळमना मार्गावर रास्तारोको केल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प होती. नवीन कामठीचे ठाणेदार संतोष बाकल यांनी घटनास्थळी येऊन मध्यस्थी केल्याने तणाव निवळला.

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश महादेव तांबे (वय ४८, रा. लष्करीबाग, नागपूर) या कोरोना रुग्णाला नातेवाईकानी २८ दिवसांपूर्वी उपचारासाठी कामठी कळमना मार्गावरील खुशबू मोटारसमोरील लाईफलाईन या खाजगी कोविड सेंटरमध्ये भरती केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान नातेवाईकांनी तीन लाख ५० हजार रुपये हॉस्पिटलमध्ये जमा केले होते.

आज पुन्हा डॉक्टरांनी मृताच्या नातेवाईकांना चार लाख ९५ हजार रुपये भरणार नाहीत तोपर्यंत मृतदेह देणार नसल्याचे सांगितल्यामुळे नातेवाईक संतापले. नातेवाईकांनी आणखी ५० हजार रुपये देतो, मृतदेह देण्यासाठी विनवणी केली. परंतु, डॉक्टरांनी पूर्ण पैसे जमा केल्याशिवाय मृतदेह देण्यास नकार दिला. मृताचे नातेवाईक सुरेंद्र खंडारे यांनी पैशासाठी मृतदेह देत नसल्याची तक्रार नवीन कामठी पोलिसांत दिली. डाॅक्टरांनी मृतदेह न दिल्याने नातेवाईकांनी हॉस्पिटलसमोर रास्तारोको केला.

नवीन कामठीचे ठाणेदार संतोष बाकल, दुय्यम निरीक्षक राधेश्याम पाल घटनास्थळी येऊन नातेवाईक व डॉक्टरांसोबत मध्यस्ती समजूत घातली. नातेवाईकांनी एक लाख रुपये दिल्यावर डॉक्टरांनी मृतदेह नातेवाईकांना दिला. कामठीतील काही खाजगी कोविड सेंटर हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या नावावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची लुबाडणूक होत असून, अशा खाजगी कोविड हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya: रामनवमीला रामललाचा 'सूर्याभिषेक'! दुपारी १२ वाजता सूर्यकिरणे कपाळावर चमकणार; शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा अद्भूत सोहळा!

Jalna News: रुग्णवाहिकांच्या इंधनाचा उद्‍भवणार प्रश्न; पेट्रोल पंपधारकांना क्रेडिटवर डिझेल पेट्रोल बंद झाल्याने उधारी बंद होणार

Ashok Kharat Fraud : अशोक खरात की लक्ष्मण? नाशिकच्या भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर; दहावी मार्कशीटमधील 'या' आकड्यांनी उडाली खळबळ, कसं बदललं नाव?

Ashish Shelar: ‘मराठी’साठी चित्रनाट्यगृह उभारणार, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांची घोषणा

PMP Bus: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक गतिमान; पीएमपीत १५९९ बस दाखल, मेट्रोचा २०० किलोमीटर विस्तार अर्थसंकल्पात जाहीर

SCROLL FOR NEXT