नागपूर : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे नवे दोन स्ट्रेन आढळून आल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानंतर हे कोरोना स्ट्रेन नेमके कोणत्या शहरातील आहेत यावर दिवसभर खलबते सुरू होती. नागपुरातील मेयो आणि मेडिकलमधून सुमारे शंभरापेक्षा अधिक नवीन स्ट्रेनचे नमुने डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत तपासणीसाठी दिल्ली तसेच पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामुळे कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचे रुग्ण नागपुरातील असल्याबाबतची जोरदार चर्चा उपराजधानित असून नागपूरकारंमध्ये कोरोनाच्या नवीन स्ट्रेनने चिंता वाढवली आहे.
महाराष्ट्रात आढळून आलेल्या कोरोनाची E484Q आणि L448Q ही नवीन दोन स्ट्रेनची नावे असल्याची माहिती केंद्रशासनाकडून प्रसारित करण्यात आली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात हे नवीन स्ट्रेन सापडले आहेत, त्या शहरांची नावे गुपित असल्याने यातील गूढ वाढले आहे. नागपूर शहरातून शंभरपेक्षा अधिक तसेच राज्यभरातून सुमारे १५ ते २० टक्के नमुन्यांमध्ये हे नवीन म्युटेशन आढळून येत असल्याचे उघड केले आहे. यामुळे डिसेंबर २०२० मध्ये आढळून येणाऱ्या म्युटेशनपेक्षा हे वेगळे म्युटेशन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आफ्रिका, युके आणि ब्राझीलमधील नवे म्युटेशन देशातील १८ राज्यांमध्ये आढळून आले आहेत. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे, मात्र महाराष्ट्रातील शहरांचा नामोल्लेख टाळण्यात आल्यामुळे नागपुरातून पाठवण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये हे स्ट्रेन आढळून आले असावेत अशा चर्चेला उधाण आले आहे.
हेही वाचा - श्वास घेणं कठीण झालं, पण दाखविली मरणाची वाट; चार खासगी रुग्णालयात खेटे घातल्यानंतर मेडिकलमध्ये...
संशयिताचा पहिला नमुना मेडिकलमधून -
कोरोनाच्या नवीन स्ट्रेनसाठी इंग्लडवरून आलेल्या एका युवकाचे नमुने पाठवण्यात आले होते. तो पहिला संशयित नमुना पाठवण्यात आला होता. यानंतर मेयोतून २७ नमुने दिल्ली आणि पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठवण्यात आले होते. विशेष असे की, इंग्लंडमधून आलेल्या या युवकाच्या संपर्कातील सुमारे दहा ते बारा जण कोरोनाबाधित आढळले होते. त्यांचेही नमुने एनआयव्हीकडे नवीन स्ट्रेन तपासणीसाठी पाठवले होते. नेमके तीन महिन्यानंतर नवीन स्ट्रेन महाराष्ट्रातील असल्याचे पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
नवीन स्ट्रेनवरही लस प्रभावी -
सद्या आढळून आलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवरदेखील कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस प्रभावी असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर वैद्यक तज्ज्ञांनी दिली. लस प्रभावी असल्याची माहिती देण्याचा अधिकार आमचा नाही, परंतु जागतिक पातळीवरील चर्चेतून या दोन्ही लस कोरोनाच्या बदललेल्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचे जाहीर केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.