strict actions will be taken against nagpur police if found using mobile phones
strict actions will be taken against nagpur police if found using mobile phones  
नागपूर

पोलिसांनो सावधान! ड्युटीवर मोबाईल वापरल्यास होणार कडक कारवाई; पोलिस आयुक्तांची आक्रमक भूमिका

अनिल कांबळे

नागपूर ः शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी रत्यावर ड्युटी बजावणारे वाहतूक पोलिस कर्मचारी सतत मोबाईलवर बोलत असतात किंवा वॉट्सॲवर चॅटिंग करीत असतात. त्यांचे वाहतूक नियंत्रणाकडे लक्ष राहत नाही. या प्रकाराची पोलिस आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेतली असून ड्युटीवर मोबाईल वापरणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक शाखेतील अनेक पोलिस कर्मचारी रस्त्यावर ड्युटी करताना नेहमी मोबाईलवर बोलत असतात किंवा वॉट्सॲपर चॅटिंग करीत असतात. यामध्ये विशेषतः महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक अस्ताव्यस्त असते. गेल्या काही दिवसांपूर्वी हायकोर्ट परिसरातील एका रोडवरील एक महिला पोलिस कर्मचारी सतत मोबाईलवर बोलत असल्याचे न्यायमूर्तींच्या लक्षात आले होते. 

या प्रकाराची हायकोर्टाने स्वतःहून दखल घेत पोलिस आयुक्तांना सूचना केल्या होत्या. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी थेट लेखी आदेश काढून पोलिस कर्मचाऱ्यांना मोबाईल न वापरण्यास बंदी घातली आहे. यानंतर ड्युटीवर असताना मोबाईलवर वाहतूक पोलिस कर्मचारी बोलताना दिसल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

वॉकीटॉकीचा वापर करा

सध्या वाहतूक शाखेत २२५ वॉकीटॉकी आहेत. त्यात आणखी भर घालत ५० वॉकीटॉकी देण्यात आल्या आहेत. पोलिसांना आता ड्युटीवर जाताना मोबाईल ड्युटी मदतगारांकडे जमा करावा लागणार आहे. कार्यालयीन सूचना असल्यास वॉकीटॉकीचा वापर करावा. तसेच रायडर किंवा मोबाईल वाहनाचा वापर करण्यात यावा. मोबाईल फोन नसल्यामुळे काम अडले आहे, ही सबब यापुढे चालणार नाही.

पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांचे काय ?

शहरातील सर्वच पोलिस ठाण्यात ड्युटीवर असताना विशेषतः महिला अधिकारी आणि कर्मचारी मोबाईलवर व्‍यस्त असतात. फेसबुक, वॉट्सॲप, इंस्टाग्रामवर चॅटिंग करीत असतात. अनेकदा तक्रारदारांकडे दुर्लक्ष करीत मोबाईलवर बोलत असतात. अनेकींना सेल्फीचे वेड लागलेले असते. त्यामुळ वाहतूक कर्माचारी तर सुधरून जातील परंतु, पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे काय? असा सवाल निर्माण झाला आहे.

पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश पोलिस कर्मचाऱ्यांना दिले आहेत.कार्यालय आणि अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी यानंतर वॉकीटॉकीचा वापर करण्यात येणार आहे. यानंतर वाहतूक पोलिस कर्माचारी मोबाईल वापरताना दिसल्यास थेट कारवाई करण्यात येईल.
- विक्रम साळी, 
पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT