The student committed suicide Nagpur crime news
The student committed suicide Nagpur crime news 
नागपूर

‘जिंदगी दो दिन की हैं यारों... मैं तो छोड चला’ असे लिहून विद्यार्थ्याची आत्महत्या

अनिल कांबळे

नागपूर : ‘जिंदगी दो दिन की हैं यारों... मैं छोड चला’, आई-बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका. शांत रहा आणि विचार करा’ असा सल्ला देऊन एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. अर्णव विजय राणे (१८, रा. अध्यापकनगर, महल्ले सभागृहाजवळ) असे विद्यार्थ्याने आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अर्णव हा बारावीचा विद्यार्थी होता. त्याच्या वडिलांचे शताब्दी चौकात बांधकाम साहित्य विकण्याचे दुकान आहे. त्याला नऊ वर्षाचा भाऊ आहे. तर आई घरी ट्यूशन क्लासेस घेते. आठ एप्रिलला रात्री जेवण करून तो आपल्या खोलीत झोपायला गेला. रात्रीच्या वेळी त्याने सीलिंग पंख्याला चादर बांधून गळफास लावला.

शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास त्याच्या वडिलांनी त्याला उठविण्यासाठी फोन केला असता त्याने कसलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी दार तोडून पाहणी केली. दरम्यान, तो गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यामुळे वडिलांना धक्का बसला. या आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजले नसले तरी पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

युवकाची आत्महत्या

चंद्रमणीनगर परिसरात २८ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. अभिजित दिनेश रंगारी असे मृताचे नाव आहे. ६ एप्रिलला अभिजित याने ओढणीने गळफास घेतला. नातेवाइकांना तो गळफास लावलेला दिसला. नातेवाइकांनी अभिजित याला मेडिकलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

शिक्षकाचा मृत्यू

मॉर्निंग वॉक करताना शिक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना देवनगर भागात शनिवारी सकाळी घडली. संजय लक्ष्मण वंजारी (वय ५२) असे मृताचे नाव आहे. ते चंद्रपूर येथील शाळेत शिक्षक होते. शनिवारी सकाळी संजय हे मॉर्निंग वॉक करीत होते. भोवळ येऊन ते खाली पडले. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

कुत्र्याने घेतला दुचाकीस्वाराचा जीव

वेगात असलेल्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जयंत सुधाकर ठाकरे (५१, रा. म्हाडा कॉलनी, खापरी) यांचा मृत्यू झाला. २६ मार्च रोजी रात्री ११ च्या सुमारास जयंत ठाकरे हे दुचाकीने टोल नाक्याजवळील डब्ल्यू बिल्डिंगजवळून जात होते. तोच अचानकपणे एक बेवारस कुत्रा त्यांच्या दुचाकीसमोर आला. ठाकरे यांनी करकचून ब्रेक दाबला. त्यामुळे दुचाकीसह ते रस्त्यावर पडून ते गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT