student demand to open hostel in nagpur
student demand to open hostel in nagpur 
नागपूर

शिकण्यासाठी धडपड, दररोज सुमारे दोनशे किलोमीटरवरून करतात ये-जा; पण सामाजिक न्याय विभाग झोपेत

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनामुळे मागील वर्षी वसतिगृह सुरू झाले नाही. आता महाविद्यालये सुरू झाले. प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. राहायचे कुठे हा प्रश्न आता गरीब विद्यार्थ्यांपुढे आहे. 

कुणी यवतमाळचा, तर कुणी गडचिरोलीचा. यांचे प्रवेश नागपूरच्या विविध महाविद्यालयात आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. निवासाची सोय नसल्याने दर दिवसाला यवतमाळ, गडचिरोली येथून पहाटे निघतात. परीक्षा देतात आणि पुन्हा गावाला परत जातात. सामाजिक न्याय विभागाची विभागात वसतिगृहे आहेत. मात्र, अद्याप सुरू करण्यात आली नाही. तेथे भोजनाची व्यवस्था नाही. यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी राहायचे कुठे? शिकायचे कसे. साहेब तुम्ही मोठ्या साहेबांना सांगून वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न करा, असे ते म्हणतात. गरिबांनी शिकायचं नाही का? हा सवालही त्यांनी विचारला. 

सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालविण्यात येतात. नागपूर विभागात ७८ वसतिगृह आहेत. प्रत्येक वसतिगृहाची क्षमता १०० विद्यार्थ्यांची आहे. याशिवाय विभागीय स्तरावरील एका वसतिगृहात २५० विद्यार्थी क्षमता असते. मात्र, यावर्षी एकही वसतिगृह सुरू करण्यात आले नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न उभा ठाकला आहे. होस्टेल सुरू करा म्हणून दर दिवसाला विनवणी करण्यासाठी ही मुले सामाजिक न्याय भवनात अधिकाऱ्यांना भेटतात. मात्र, हाती काहीच लागत नाही. 

आधार ठरतात वसतिगृहे - 
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थी निवास, भोजनसह शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेतात. महाराष्ट्रात वसतिगृहात राहून हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. वसतिगृहांना सामाजिक न्याय विभागांतर्गत भोजनाची, निवासाची सोय होत असल्याने गरिबांना ही वसतिगृह आधार वाटतात. मात्र, यावर्षी एकही वसतिगृह सुरू झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवर मोकळ्या आकाशाखाली निवारा शोधावा लागत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT