student preference for agricultural courses including pharmaceuticals in nagpur university
student preference for agricultural courses including pharmaceuticals in nagpur university 
नागपूर

आता प्रवेशासाठी चुरस, औषधनिर्माणसह कृषी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची पसंती

मंगेश गोमासे

नागपूर : राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक परीक्षेचा (एमएचसीईटी) निकाल शनिवारी घोषित करण्यात आला. निकालानंतर आता विद्यार्थ्यांचे प्रवेशाकडे लक्ष लागले आहे. निकालात यावर्षी वाढ झाल्याने प्रवेशात यंदा चुरस दिसून येत आहे. अभियांत्रिकीची प्रक्रिया लांबल्याने यावेळी रिक्त जागांची समस्या कायम राहणार असून औषधनिर्माण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गर्दी होणार असल्याचे चित्र आहे. 

यंदा शंभर पर्सेंटाईल म्हणजे सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणाया भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) या विषय गटाची परीक्षा देणाऱ्या २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. त्याशिवाय ८५ ते १०० पर्सेंटाईल मिळवणारे २६ हजार ५०२ विद्यार्थी आहेत. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार आहे. 

औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) या विषय गटात सर्वोत्तम म्हणजे १०० पर्सेंटाईल मिळवणारे १९ विद्यार्थी आहेत. त्यामुळे मुळातच गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांची मागणी वाढत असलेल्या या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची स्पर्धा यंदा वाढण्याची शक्यता आहे. २५ हजार जागांसाठी २ लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशाच्या स्पर्धेत आहेत. त्यात ८५ पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३२ हजार सातशे आहे. 

अभियांत्रिकीवरचे संकट कायम - 
यंदा प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. असे असले तरी त्यातील प्रत्यक्ष परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. गेल्या वर्षी राज्यातील ५६ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. अभियांत्रिकी शाखेच्या १ लाख ७४ हजार ६७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. राज्यात अभियांत्रिकीच्या १ लाख २० हजार जागा उपलब्ध आहेत. यंदा प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू होत आहे. सध्या विद्यार्थ्यांनी इतर विषयांना प्रवेश घेतला आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी स्पर्धा असली तरी मधल्या फळीतील आणि तळातील महाविद्यालयांना यंदाही विद्यार्थी शोधावे लागणार असल्याचे चित्र आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

SCROLL FOR NEXT