Students did copy in online exams of RTMNU  
नागपूर

नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत कॉपीबहाद्दरांचा धुमाकूळ; विद्यापीठाचा दावा फोल 

मंगेश गोमासे

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपमध्ये सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात विद्यापीठाचा हा दावा फोल ठरला असून ऑनलाईन परीक्षेत, मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच निकालातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी ‘आरटीएमएनयू परीक्षा‘नावाचे ॲप तयार केले. या ॲपमध्ये विद्यार्थी जेव्हा हालचाल करेल, तेव्हा त्याची फोटो आणि त्याने स्क्रीन बदलल्यास त्याचे मोजमाप करण्यात येऊन अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येईल असे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी सांगितले होते. 

विशेष म्हणजे, हे प्रकरण अनुशासन समितीकडे पाठविण्यात येईल असेही स्‍पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार विद्यापीठाने ८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान परीक्षा घेण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी धडाक्यात कॉपी करीत १०० पैकी १०० गुण मिळविल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षेचे तीन तेरा वाजले. त्यामुळे कॉपी करण्याची माहिती आणि संबंधित फोटोच विद्यापीठाकडे उपलब्ध नसल्याचे दिसून येते. 

याबाबत तज्ज्ञांना विचारणा केली असता, ७० हजारावर विद्यार्थ्यांचे फोटो आणि माहितीचा डेटा ठेवता येणे अशक्य असून त्यामुळे परीक्षेत बरेच अडथळे येण्याची शक्यता असल्याने त्यात कॉपी करण्यापासून थांबविण्यासाठी यंत्रणाच नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

राज्यातील विद्यापीठात ही यंत्रणाच नाही

ऑनलाईन परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यापीठांद्वारे तयार करण्यात आलेल्या ॲपमध्ये कुठलीच यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, केवळ नागपूर विद्यापीठच नव्हे तर राज्यातील कोणत्याच विद्यापीठाद्वारे ते वापरण्यात आले नसल्याचे समजते. त्यामळे ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांचे चांगलेच फावले असून निकालात ते दिसून आले.

व्हीडिओ व्हायरल

परीक्षेदरम्यान धडाक्यात कॉपी करीत असल्याचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्या समोर पुस्तके घेऊन पेपर सोडविण्यात येत असल्याचे दाखविण्यात आले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT