Students do not have uniforms due to non-receipt of funds for Samagra Shiksha Abhiyan 
नागपूर

काय हे... बजेट मंजूर, तरी कधी मिळणार विद्यार्थ्यांना गणवेश?

नीलेश डोये

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाकरिता समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत दरवर्षी निधी दिला जातो. यंदा कोरोना असल्यामुळे शाळा अजूनही सुरू झाल्या नाही. त्यामुळे समग्र शिक्षा अभियानाचे बजेट मंजूर होऊनही गणवेशाचा निधी शिक्षण विभागाला मिळाला नाही.

गेल्यावर्षी ६४,०२३ विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले होते. त्यासाठी जिल्ह्याला ३ कोटी ६२ लाख रुपये समग्र शिक्षा अभियानातून मिळाले होते. यंदा समग्रचा केंद्रीय बजेट मंजूर झाला आहे. जिल्ह्यासाठी ३ कोटी ९९ लाख रुपये मंजूर झाले आहे. पण, यंदा केंद्र सरकारकडून राज्य सरकारलाच समग्रचा निधी मिळाला नाही. 

दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर समग्र शिक्षा अभियानांतर्गत अनुदान मिळणे सुरू होते. पण, यंदा कोरोनामुळे अजूनही शाळा सुरू झाल्या नाही. केंद्र सरकारने शाळ सुरू करण्याचे संकेत दिले. मुळात अनुदान देताना समग्रच्या गेल्यावर्षीच्या बजेटचे ऑडिट केले जाते. परंतु, यंदा ऑडिटच सुरू झाले नाही. 

सूत्रांच्या मते, १५ सप्टेंबरपर्यंत ऑडिट होईल. ऑडिटचा रिपोर्ट महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेला गेल्यानंतरच समग्रच्या अंतर्गत मिळणाऱ्या गणवेशाचे वितरण सुरू होईल. जिल्हा परिषदने यंदा सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी निधीची तरतूदही केली. सर्व विद्यार्थ्यांना समान गणवेशाकरिता रंगही निश्चित केला आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT