Suicide committed by youth in Nagpur 
नागपूर

प्लीज तू घरी परत ये, अन्‌... 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पत्नीसोबत पतीचा किरकोळ वाद झाला. वादातून पत्नीशी बोलचाल बंद झाली. त्यामुळे पत्नीने पतीचे घर सोडून माहरे गाठले. काही दिवसांतच तिला परत येण्यासाठी पतीने विनवण्या केल्या. मात्र, तिने परत येण्यास नकार दिला. यामुळे अस्वस्थ झालेल्या पतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय बाळाराम बोरकर (35, रा. भीमाईनगर झोपडपट्टी, महादुला) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय बोरकर हा गवंडीचे काम करीत होता. पूर्वी तो भाड्याने राहत होता. सहा महिन्यांपूर्वी सासऱ्याने त्याला भीमाईनगर झोपडपट्टी येथे घर बांधून दिले होते. दहा ते बारा दिवसांपूर्वी घरगुती कारणावरून त्याचा पत्नीसोबत वाद झाला होता. त्यामुळे ती माहेरी गोंदियाला निघून गेली होती. गुरुवारी दोनच्या सुमारास त्याने शेजारी राहणाऱ्या इसमाला घाबरल्यासारखे वाटते असे म्हटले होते. शेजाऱ्याने त्याची समजूत काढून झोपून जा असे म्हटले होते.

गुरुवारी सकाळी 9.30 च्या सुमारास शेजारी राहणारी एक महिला संजयच्या घरी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिला गेट बंद दिसले. तिने आवाज दिला असता संजयने कसलाही प्रतिसाद दिला नाही. महिलेने ही माहिती तिच्या पतीला दिली. पतीने आत जाऊन दाराच्या फटीतून पाहिले असता संजय गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

इसमाने घेतला गळफास

जुनी कामठी हद्दीत मोदी पडाव, नागसेननगर येथे राहणाऱ्या प्रशांत रघुनाथ रामटेके (45) या इसमाने आपल्या घरी व्हेंटीलेटरच्या खिडकीला दोरी बांधून गळफास लावला. प्रशांत हा चायनिज इलेक्‍टॉनिक्‍स वस्तू विकण्याचे काम करीत होता. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. जुनी कामठी पोलिस पुढील तपास करीत आहेत .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT