Suicide of a girl due to her boyfriend's troubles 
नागपूर

बेरोजगार मित्र सतत द्यायचा त्रास, कंटाळून तिने केली आत्महत्या

अनिल कांबळे

नागपूर :  बेरोजगार असलेल्या प्रियकराने प्रेयसीकडे लग्नासाठी तगादा लावला. प्रियकराच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली आहे. सूरज राजेश गुप्ता (२१, रा. मस्कासाथ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर राणी ऊर्फ हिमानी सोनकुसरे (१८) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी ही नुकतीच बारावी पास झाली होती. पदवीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणार होती. तिचे वडील कारखान्यात कामगार आहेत तर आई मजुरी करते. तिला दोन बहिणी आणि लहान भाऊ आहे. तिच्या वस्तीत आरोपी सूरज गुप्ता राहतो. तो बेरोजगार असून, वस्तीत दादागिरी करतो. दहावीत असताना राणी आणि सूरजची ओळख झाली. सूरजने तिला आपल्या जाळ्यात ओढले. 

अगदी १६ वर्षांची असताना ती सूरजच्या प्रेमात पडली. दोघांच्याही प्रेमप्रकरणाची वस्तीत चर्चा व्हायला लागली. दोन वर्षे प्रेमप्रकरण चालल्यानंतर तो तिच्यामागे लग्न करण्यासाठी तगादा लावत होता. मात्र, राणीला पुढे शिक्षण घ्यायचे होते. त्यामुळे ती लग्नासाठी त्याला नकार देत होती. 
 

मित्रांशी बोलण्यास मनाई

रिकामटेकडा असलेला सूरज नेहमीच राणीच्या मागावर राहत होता. तिला शाळकरी मित्रांशी बोलण्यास मनाई करीत होता. वस्तीतील अन्य युवकांशी बोलू देत नव्हता. शेजारी राहणाऱ्या मुलांशी जरी बोलली तरी तो राणीला मारहाण करीत होता. तिचा मोबाईल हिसकावून घेत होता. 
 

आई-वडील घाबरायचे

आरोपी सूरज राणीच्या घरी यायला लागला. तिच्या आई-वडिलांना राणीशी लग्न करण्याची मागणी घालत होता. लग्नास नकार दिल्यास राणीला घरातून उचलून नेऊन बलात्कार करण्याची धमकी देत होता. त्याच्या दादागिरीला तिचे आई-वडील घाबरत होते. त्यामुळे त्याची हिंमत वाढली होती. तिला नेहमी लग्न करण्यासाठी तगादा लावत होता. 
 

घरात झाला राडा 

राणीने घराबाहेर पडणे बंद केले, त्यामुळे चिडून तो  एक सप्टेंबरला तिच्या घरी आला. त्याने तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. राणीचा हात पकडून सोबत घरी नेण्याचा प्रयत्न करीत होता. राणीने उद्या भेटण्याचे आमिष दिल्यानंतर तो धमकी देऊन निघून गेला. 
 

...म्हणून केली आत्महत्या

सूरजने घरी येऊन तमाशा केल्यामुळे वस्तीत राणी आणि तिच्या कुटुंबीयांची बदनामी झाली. दोन सप्टेंबरला सायंकाळी राणी सूरजच्या घराजवळ भेटायला गेली. तिने सूरजला लग्नासाठी थेट नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या सूरजने तिला रस्त्यावरच मारहाण केली. लग्न करण्यासाठी दबाव टाकला. त्यामुळे त्रस्त झालेल्या राणीने तेथेच विष प्राशन करून आत्महत्या केली. तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी सूरजवर गुन्हा दाखल करून अटक केली.

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, मन जिंकणारे विधान; म्हणाला, तो नसता तर मी इथे उभा नसतो

ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT