file photo 
नागपूर

दुसर लग्न करण्यासाठी पती करायचा छळ; पत्नीने घेतला हा निर्णय...

अनिल कांबळे

नागपूर : प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी उतावीळ झालेल्या पतीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून महाजन ले-आउट येथे २५ वर्षीय विवाहितेने विष घेऊन करून आत्महत्या केली. याप्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अश्विनी प्रवीण घुग्गुसकर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरेडमध्ये राहणाऱ्या उच्चशिक्षित अश्विनीचा २०१६ मध्ये प्रवीण घुग्गुसकर (३२, महाजन ले-आउट, हुडकेश्‍वर) याच्याशी विवाह झाला. त्यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. सुरुवातीचे काही महिने त्यांचा संसार व्यवस्थित सुरू होता. त्यानंतर मात्र पतीने अश्विनीला विनाकारण मारहाण करणे सुरू केले. ‘माझे एका युवतीवर प्रेम आहे, तिच्यासोबत लग्न करायचे आहे. त्यामुळे तू मुलासह माहेरी निघून जा’, अशी धमकी प्रवीण पत्नीला देत होता. अश्विनीला पतीसह सासरे लक्ष्मण घुग्गुसकर, सासू लीलाबाई आणि अश्विनी काळबांडे हे मारहाण करीत होते. तिच्यावर घटस्फोटासाठी दबाव टाकण्यात येत होता. 

प्रेयसीला आणले घरी 
अश्विनी घटस्फोट देण्यास तयार नव्हती. त्यामुळे प्रवीणने प्रेयसीला घरी आणणे सुरू केले. पत्नी घरी असताना ते दोघे बेडरूममध्ये एकत्र रहायचे. वारंवार घडत असलेल्या या प्रकाराला अश्विनी कंटाळली होती. पतीची प्रेयसीही अश्विनीला धमकी देत होती. 

म्हणून घेतले विष 
गुरुवारी सकाळी अश्विनीला पतीने माहेरी जाण्यासाठी मारहाण केली. प्रेयसीसोबत महिनाभरात लग्न करण्याची धमकी दिली. त्यामुळे अश्वि‍नीने विष घेतले. ही बाब पतीच्या लक्षात आली. परंतु, त्याने कुणालाही सांगितले नाही. अश्विनीचा उपचाराअभावी मृत्यू झाला. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kokilaben Ambani Hospitalised : कोकिळाबेन अंबानी यांची अचानक तब्येत बिघडली, एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल

Maharashtra Latest News Live Update : व्हिडिओ माझाच पण त्यातील आवाज माझा नाही, लक्ष्मण हाके

Solapur Bailpola:'अकोलेकाटीत वीस वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या दारात होती बैलजोडी'; आज बोटावर मोजण्याइतक्याच; ट्रॅक्टरने बळकावली बैलांची जागा

South America Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने दक्षिण अमेरिका हादरली ! 8.0 इतकी तीव्रता, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nations Cup 2025: नेशन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघाचे शिबिर सुरू; सहा दिवसांनंतरही ३५ पैकी २५ खेळाडूंचीच उपस्थिती

SCROLL FOR NEXT