Suicide by married woman in Nagpur 
नागपूर

पतीने चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

अनिल कांबळे

नागपूर : पती-पत्नीचं नातं हे विश्‍वासाचं नातं असते. कारण, विश्‍वासावरच सर्वकाही टिकून असते. तसेही पत्नी आपले घरबार सोडून सारसी येत असल्याने पतीच्या विश्‍वासाला अधिक महत्त्व असते. तिचा पतीच तिच्यासाठी सर्वकाही असतो. तोच जर तिच्यावर अविश्‍वास दाखवत असेल किंवा तिच्या चारित्र्यावर संशय घेत असेल तर तिने काय करावं, असा प्रश्‍न निर्माण होतो. अशाच एका प्रकरणात पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घातला. सततच्या वादाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले... 

रूपाली (वय 40, रा. शामनगर) या शोरूममध्ये कामाला होत्या. त्या पती, दोन मुले आणि आई-वडिलांसह शामनगर येथे राहत होत्या. रूपाली यांना मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकला जाण्याची सवय होती. त्यामुळे त्या रोज सकाळी आणि सायंकाही घराबाहेर पडत होत्या. त्यांना आरोग्याची काळजी असल्याने अनेक दिवसांपासून नित्यनियमाने वॉकिंगला जात होत्या.

मात्र, पतीला त्यांचे मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकला जाणे मान्य नव्हते. काही दिवसांपासून रूपाली यांचे घरातून बाहेर पडण्यावर पतीला संशय होता. रमेश यांना एकप्रकारे त्यांच्या चारित्र्यावरच संशय होता. मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकच्या निमित्याने रूपाली या कुणाला तरी भेटायला आणि फिरायला जात असल्याचा संशय पतीला होता. यामुळे नेहमी त्यांच्यात वाद होत होता. अनेकदा पतीने त्यांना मारहाण देखील केली होती. मात्र, रूपाली या पतीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत नित्यनियमाने वॉकिंगला जात होत्या. 

रूपाली यांच्या या निर्णयाने पतीचा पारा अधिकच चढला होता. याच कारणावरून त्यांच्यातील वाद अधिक उफाळून आला. मंगळवारी त्यांच्यात चांगलेच भांडण झाले. "तुझे दुसऱ्या युवकासोबत संबंध आहे, त्याला भेटण्यासाठी तू बाहेर जाते', असे म्हणून पतीने चांगलाच वाद घातला.

यावेळी रूपाली यांनी आपण आरोग्यासाठी सकाळी आणि सायंकाही वॉकिंगला जात असल्याचे सांगितले. मात्र, पतीला काही विश्‍वास बसत नव्हता. तरीही रूपाली यांनी पतीची समजूत काढण्याचा भरपूर पर्यंत केला. मात्र, संशयाचे भूत शीरलेल्या पतीला विश्‍वास काही बसेना. यातून रूपाली यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मध्यरात्री घेतला गळफास

पतीने चारित्र्यावर संशय घेत माहराण केली. विनाकारण मारहाण केल्यामुळे रूपाली यांना राग आला होता. त्यांनी मंगळवारी रात्री नऊ वाजता जेवण केले. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी कुटुंबीयांना खोली बंद दिसल्यामुळे संशय आला. दार उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain : मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान; नांदेड, लातूर जिल्ह्यांत कहर; सात जिल्ह्यांतील १३० मंडलांना दणका

ED Notice : ‘ED’चे मोठे पाऊल!, इंटरपोलकडून पहिल्यांदाच पर्पल नोटीस जारी

Vani Accident : टॅक्टर ट्रॉलीस कारची धडक; १३ महिलांसह १४ जखमी

Ganesh Naik: अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा, गणेश नाईक यांचे आदेश

यंदाच्या विसर्जन मिरवणुका होणार डीजेमुक्त! पोलिस आयुक्त कारवाईबाबत सक्त, ‘डीजे’वाले वरमले; डीजेविरोधातील असंतोषाला वाट, दर तासाला ३०० सोलापूरकरांचे मिस कॉल

SCROLL FOR NEXT