Summer effect increased in Nagpur and Vidarbha  
नागपूर

'फेब्रुवारी तो झाकी हैं, एप्रिल-मे बाकी हैं'; नागपूरसह विदर्भाला उन्हाचे चटके; पारा चाळीशीकडे; 

नरेंद्र चोरे

नागपूर: विदर्भात उन्हाचे चटके दिवसागणिक वाढू लागले आहेत. ऐन फेब्रुवारीतच पाऱ्याची चाळिशीकडे वाटचाल सुरू असून, मार्च, एप्रिल आणि कडक उन्हाचा मे महिना अजून बाकी असल्याने यंदाचा उन्हाळा वैदर्भीची चांगलीच परिक्षा घेणार, अशी चिन्हे दिसत आहेत. तसे संकेत हवामान विभागाकडून मिळाले आहेत.

साधारणतः पानगळ सुरू झाली की वैदर्भीना उन्हाळ्याची चाहूल लागते. धुळवडीनंतर उन्हाचे तीव्र चटके बसू लागतात. मात्र यंदा निर्धारित वेळेपूर्वीच उन्हाळा तापू लागला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नागपूरकर तो अनुभव घेताहेत. तापमानात दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून, विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. 

हवामान विभागातर्फे शुक्रवारी नागपूर शहरात ३७.७ कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या पाच दिवसांमध्ये पाऱ्यात तब्बल सात अंशांची वाढ झाली आहे. ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. याशिवाय अकोला (३८.२ अंश सेल्सिअस) चंद्रपूर (३८.२ अंश सेल्सिअस), अमरावती (३७.२ अंश सेल्सिअस), वर्धा (३७ अंश सेल्सिअस), यवतमाळ (३७ अंश सेल्सिअस) या जिल्ह्यांतही पारा ३७ पार गेला आहे. 

किमान तापमानातही दिवसागणिक वाढ होत आहे. हवामान विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही कडक उन्हाळा जाणवणार असल्याचे यापूर्वीच संकेत दिले आहेत.

एसी, कुलर निघू लागले

सकाळी नऊ- दहा वाजतापासूनच उन्हाचे चटके जाणवायला सुरवात होते. दुपारनंतर ऊन तीव्र होत जाते. अचानक ऊन वाढल्याने पंखे गरगरा फिरू लागले आहेत. उन्हाचा वाढता सपाटा लक्षात घेता यंदा एसी व कुलर बाहेर निघण्यास सुरवात झाली आहे. मार्च उंबरठ्यावर असल्याने तापमानात आणखी वाढ अपेक्षित आहे. सध्याचे वातावरण आणि हवामान विभागाचा एकूणच अंदाज बघता 'फेब्रुवारी तो सिर्फ झाकी हैं, एप्रिल-मे अभी बाकी हैं' असे म्हणायला हरकत नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT