नागपूर

तारीख ठरली : विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा आता २९ जूनपासून

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) परीक्षा एक महिना स्थगित करण्याचे आदेश कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी (Dr. Subhash Chaudhary) यांनी दिले होते. त्यामुळे विद्यापीठाने शुक्रवारी काढलेल्या परिपत्रकानुसार विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना २९ जूनपासून घेण्यात येईल. याशिवाय यामधील विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा १५ जूनपासून घेण्यात येईल. या लेखी परीक्षा पूर्वी २३ मेपासून घेण्यात येणार होत्या. याशिवाय कोरोनाचा संसर्ग (Corona infection) लक्षात घेता, महाविद्यालयास्तरावर सुरू असलेल्या हिवाळी परीक्षा आता ३१ मे पर्यंत घेता येणार आहेत. (Summer exams now from June 29)

विद्यापीठाद्वारे एम.ए., एम.कॉम, एसएस.स्सी. आणि सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रथम वर्षांच्या हिवाळी परीक्षा ५ ते २० मेदरम्यान घेण्याची घोषणा विद्यापीठाने केली होती. याशिवाय २४ मे पासून उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक घोषित केले होते. मात्र, पंधरा दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येक घराआड रुग्ण असल्याचे दिसून येते. यामध्ये बरेच प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे.

यादरम्यान विद्यापीठाने परीक्षा घेऊ नये यासाठी प्राचार्य फोरमने पक्ष दिले. याशिवाय ज्येष्ठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. आर.जी. भोयर यांनी कुलगुरूंना कोरोनाची परिस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानुसार विद्यापीठाने एक महिना परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आज त्याचे परिपत्रक काढण्यात आले. त्यामध्ये १५ जूनपासून उन्हाळी परीक्षांचे प्रात्यक्षिक घेण्यास सुरुवात होणार आहे. याशिवाय २९ जूनपासून लेखी परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले.

यामध्ये तीन वर्षीय अभ्यासक्रमातील सहावे सेमिस्टर, चार वर्षीय अभ्यासक्रमातील आठवे आणि दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्याक्रमातील चौथे सेमिस्टरची परीक्षा विद्यापीठ स्तरावर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. इतर सेमिस्टरबाबतीत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. याशिवाय ५ ते २० मेदरम्यान होणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षा आता महाविद्यालयांना ३१ मेपर्यंत घेता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

२९ मेपर्यंत अर्ज भरता येणार

विद्यापीठाद्वारे परिपत्रकात ९ हिवाळी परीक्षा स्थगीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये बीई-१. बीटेक-१, बी.फार्म-१, बीई-३, बीटेक-३, बी.फार्म-३, बीएचएमसीटी-१, एलएलबी -१ (३ वर्षीय), बीएएलएलबी-०१ (पाच वर्षीय) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हिवाळी परीक्षा सुरू असताना, त्या सेमिस्टरच्या पुढच्या अभ्यासक्रमासाठी म्हणजेच उन्हाळी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १५ मे ऐवजी आता २९ मे पर्यंत परीक्षा अर्ज सादर करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

२१ हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होणार

विद्यापीठाद्वारे जाहीर परिपत्रकात ९ हिवाळी परीक्षा स्थगित करण्यात आल्यात. यामध्ये बीई-१, बीटेक-१, बी.फार्म-१, बीई-३, बीटेक-३, बी.फार्म-३, एलएलबी-१ (तीन वर्षीय), बीएएलएलबी-१ (पाच वर्षीय) अभ्यासक्रमांचा समावेश आहे. मात्र, यापूर्वी विद्यापीठाने १२ परीक्षा स्थगीत केल्या होत्या. यामुळे आता एकूण २१ परीक्षांचे वेळपत्रक विद्यापीठ लवकरच घोषित करणार आहेत.

(Summer exams now from June 29)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT