A sundar biscuit fined 65 thousand by nagpur nmc 
नागपूर

"सुंदर बिस्किट'ला बसला दंड, हे आहे कारण...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व दुकाने, इंडस्टिज बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. निर्देश झुगारून बिस्किटचे उत्पादन सुरू ठेवणाऱ्या सुंदर बिस्किट इंडस्टिजला महापालिकेने 65 हजारांचा दंड ठोठावला.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व दुकाने, आस्थापना, इंडस्टिज बंद करण्याबाबत मुंढे यांनी शुक्रवारी निर्देश दिले. शहरातील बहुतांश दुकाने आज बंद होती. मात्र, कोराडी मार्गावरील सुंदर बिस्किट इंडस्टिजमध्ये बिस्किटचे उत्पादन सुरू असून, तेथे 50 ते 60 कर्मचारी असल्याची माहिती मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांना मिळाली.

आयुक्त मुंढे यांच्या निर्देशानुसार त्यांनी आरोग्य निरीक्षक व उपद्रव शोधपथकासह दुपारी साडेबाराच्या सुमारास सुंदर बिस्किट इंडस्टिजवर धाड टाकली. यावेळी येथे कर्मचारी बिस्किटचे उत्पादन करीत असल्याचे आढळून आले. महापालिकेने सुंदर बिस्किट इंडस्टिज व्यवस्थापनावर 65 हजारांचा दंड ठोठावला. बंददरम्यान इंडस्टिज सुरू ठेवल्याप्रकरणी ही पहिलीच मोठी कारवाई महापालिकेने केली. त्यामुळे आता इतर इंडस्टिज व्यवस्थापकांत खळबळ उडाली आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वच बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर दुकाने, रेस्टॉरंट, सलून, चहा, पानटपऱ्या बंद आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र ते दिल्ली, राजकीय घडामोडींपासून हवामानापर्यंत; एका क्लिकवर वाचा देश-विदेशातील टॉप अपडेट्स

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT