सुरेश साखरे यांना सेनेचा झेंडा देताना आमदार दुष्यंत चतुर्वेदी, प्रमोद मानमोडे व इतर 
नागपूर

साखरे यांच्यासाठी शिवसेना गोड! बसपा पदाधिकाऱ्यांसह प्रवेश

राजेश प्रायकर

नागपूर : बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे (Suresh Sakhare) यांनी रविवारी शिवसेना संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. दोन वर्षांपूर्वी त्यांना बसपातून निलंबित (Suspended in bsp) करण्यात आले होते. अनेक बसपातील पदाधिकारी व कार्यकर्त्यासह त्यांनी सेनेत प्रवेश घेतला. (Suresh-Sakhare-joins-ShivSena)

सिव्हिल लाइन्स येथील आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या निवासस्थानी त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सेनेचे महानगरप्रमुख प्रमोद मानमोडे, शहर प्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे, शहर संघटक विशाल बरबटे, किशोर पराते, नगरसेविका मंगला गवरे, उपजिल्हा प्रमुख बंडू तळवेकर उपस्थित होते.

आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनी त्यांच्याकडे सेनेचा झेंडा सोपविला. यावेळी त्यांच्यासोबत बसपाचे माजी प्रदेश सचिव त्रिभुवनपाल तिवारी, बहुजन विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेशचे संयोजक नंदकिशोर इंगोले, बसपा महिला आघाडीच्या माजी शहर अध्यक्षा मंजुळा प्रसाद, माजी उपाध्यक्ष सुभाष गजभिये, उत्तर नागपुरातील बसपा पदाधिकारी शुरूर सिद्दीकी यांच्यासह शेकडो बसपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वात सेनेत प्रवेश घेतला.

बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्यासोबत राजकीय कारकीर्द सुरू करणारे साखरे उत्तम संघटक असून, त्यांनी अनेक राज्यात बसपा प्रभारी म्हणून काम केले. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांना २०१९ मध्ये बसपातून निलंबित करण्यात आले होते. त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणूकही लढविली होती.

उद्धव ठाकरे यांच्या कार्याने प्रभावित

दीड वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी केलेल्या कार्याने प्रभावित झालो आहे. साखरे यांच्या संघटन कौशल्याचा लाभ शहर सेनेलाच नव्हे तर राज्यातही होईल.

(Suresh-Sakhare-joins-ShivSena)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT