Suspicious death of two small sisters
Suspicious death of two small sisters Suspicious death of two small sisters
नागपूर

दोन चिमुकल्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू; नागपूर ग्रामीणमधील घटना

सकाळ डिजिटल टीम

सिल्लेवाडा (जि. नागपूर) : येथील बाजार चौक परिसरात दोन चिमुकल्या मुलींचा संशयास्पद मृत्यू (Suspicious death) झाला. ही घटना मंगळवारी (ता. ५) घडली. साक्षी फुलसिंग मिना (वय ६) व राधिका फुलसिंग मिना (वय ३) दोघेही राहणार बरबटेकडी तालुका कोंढा, जि. बारा, राजस्थान अशी मृत मुलींची नावे आहेत. (Suspicious death of two small sisters)

प्राप्त माहितीनुसार, दोन महिन्यांपासून मुलींची आई माधुरी फुलसिंग मिना ही पूनम, साक्षी व राधिका या तीन मुलींसह बाजार चौक परिसरात राहणारे गंगाबाई भय्याजी काळे यांच्या घरी राहत होती. मंगळवारी साक्षी व राधिका यांची प्रकृती ठीक नसल्याने आईने दोघींना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. डॉक्टरांनी तपासले असता राधिकाचा मृत्यू झाला होता तर साक्षीची प्रकृती गंभीर होती.

यामुळे डॉक्टरांनी तिला नागपुरातील मेयो रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तिला पुढील उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. यामुळे तिला अर्धा रस्त्यावरून परत घरी आणले. दोन चिमुकल्या बहिणींचा अचानक मृत्यू झाल्याचे पोलिसांना समजताच चौकशीसाठी घटनास्थळी दाखल झाले.

दोन बहिणींचा संशयास्पद मृत्यू (Suspicious death) झाल्याने रात्रीचे जेवणाचे नमुने चाचणीसाठी पोलिसांनी घेतले. दोन्ही मृत मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविले. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. दोन्ही बहिणींचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेले नाही. त्यांना अन्नातून विषबाधा तर झाली नाही ना, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT