system in schools and junior colleges are not ready enough to conduct board exams in Nagpur  
नागपूर

Ground Report: शाळा आणि महाविद्यालयस्तरावर परीक्षेसाठी यंत्रणा तोकडीच; मासकॉपीची शक्यता

मंगेश गोमासे

नागपूर ः राज्यात बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २७ एप्रिल ते २१ मेदरम्यान घेण्यात येणार आहे. या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असून त्यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर होणार आहे. मात्र, याप्रमाणे परीक्षा घेण्यासाठी विभगाकडे तोकडीच यंत्रणा असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे परीक्षेचे पावित्र्य कसे राखणार याबाबत शाशंकता निर्माण होणार आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यामुळे त्याचा परिणाम दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर पडेल असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे शनिवारी (ता. २०) शिक्षणमंत्र्यांनी याबाबत सर्व शक्यता फेटाळून लावत, ऑफलाइन परीक्षा घेण्याची घोषणा केली. याशिवाय विद्यार्थ्यांनी वेळ वाढवून देत, दिलासा दिला. याशिवाय त्या-त्या विद्यार्थ्यांच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा घेण्यात येणार आहे. 

यापूर्वी विभागीय शिक्षण मंडळाद्वारे विशिष्ट केंद्रांची निवड करुन त्या ठिकाणी परीक्षांचे आयोजन करण्यात यायचे. बारावीसाठी विभागात ४७१ परीक्षा केंद्र तर दहावीसाठी ६९२ परीक्षा केंद्र तयार करण्यात आली होती. त्यासाठी शहरात जवळपास ९ कस्टडीचा समावेश करण्यात आला होता. या

शिवाय प्रत्येक तालुक्यात एक तर मोठ्या तालुक्यात दोन कस्टडी तयार करण्यात आल्यात. या कस्टडीमध्ये त्या-त्या दिवशीचा पेपर नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, आता परीक्षा शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर होणार असल्याने विभागाकडून कस्टडीची संख्या वाढविण्याची गरज आहे. मात्र, त्यामुळे पेपर फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय शिक्षक आणि प्राध्यापकांवरच सर्व परीक्षेचा भार येणार आहे.

मासकॉपीची शक्यता

राज्यात प्रथमच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर घेण्यात येणार आहे. या प्रकाराने शाळांचा निकाल वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मासकॉपी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे आताही विभागातील काही केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपीचे प्रकार घडत असल्याचे दिसून येते. शिवाय दुर्गम भागातील शाळांमध्ये हा प्रकार अधिकच वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

Latest Marathi News Live Update : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी फलटण पोलीस ठाण्याबाहेर सुषमा अंधारेंकडून ठिय्या

मित्रांसोबत दारू प्यायला जाताय? मग पुष्कर श्रोत्रीने सांगितलेले 'हे' चार नियम नक्की पाळा, म्हणतो- माझे वडील म्हणाले...

Supreme Court : 'महाकाल मंदिरासाठी आमची 200 वर्षे जुनी मशीद पाडली'; मुस्लिम पक्षाची सर्वोच्च न्यायालयात धाव, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT