Teachers are in confusion because of reduced syllabus of schools  
नागपूर

अभ्यासक्रमाच्या कपातीवरून शिक्षक संभ्रमात; प्रकरणांऐवजी आशय, तक्त्यांमध्ये कपात

मंगेश गोमासे

नागपूर ः राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अभ्यासक्रम कमी करताना प्रकरणातील थोडा-थोडा भाग, आशय, तक्ते कमी केलेत. यामुळे विद्यार्थ्यांवरील कुठल्याही प्रकारचा ताण कमी होणार नसून शिक्षकांमध्ये संभ्रम वाढला आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने जाहीर केलेल्या पत्रानुसार पुस्ताकातील पान क्रमांकानुसार विविध प्रकरणातील काहीभाग, आशय, तक्ते कमी केले आहेत. परंतु यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने दिलेल्या विषयातील अभ्यासक्रमाच्या एकूण प्रकरणांपैकी २५ टक्के प्रकरणे कमी करणे अपेक्षित होते. मात्र, पान क्रमांकाच्या आधारे कमी झालेला अभ्यासक्रम दिसत असला तरीसुद्धा विद्यार्थ्यांना सत्र २०२०-२१मध्ये त्यांच्या विषयातील सर्वच प्रकरणांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यावरील प्रत्यक्षात ताण कमी न होता तो कायमच राहणार आहे. 

दुसरीकडे केवळ एका पाठातील काही भाग वगळण्यात आल्याने शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांना शिकविताना संपूर्ण पाठ शिकवावा लागणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात तांत्रिक कपात झाली असली तरी, प्रत्यक्षात ती कपात दिसून येत नसल्याचे शिक्षक संघटनांकडून सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे टाळेबंदीमुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यास उशिरा सुरुवात करण्यात आली. या प्रकाराने अभ्यासक्रमातील काही भाग कमी करणे परिक्षा परिषदेकडून अपेक्षित होते. मात्र, केवळ प्रकरणांमधील काही भाग कमी करुन शिक्षकांच्या अडचणींमध्ये वाढ केल्याचे चित्र दिसून येत आहे.

शिक्षकांना सुट नाहीच

परीक्षा परिषदेने अभ्यासक्रमातील जे घटक गाळले त्याचे स्वयंअध्ययनातील असून ते घटक विद्यार्थ्यांना शिकवावेच लागणार आहे. त्यामुळे गाळलेल्या घटकांचा अभ्यास शिक्षकांनाही करावा लागणार आहे. त्यातून कुढलीही सुट मिळणार नाही हे विशेष.

परिषदेने अभ्यासक्रमात कपात करताना प्रकरणांमध्ये कपात करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता केवळ प्रकरणातील काही भाग कमी केल्याने प्रकरण शिकविताना ते पूर्णच शिकवावे लागणार आहे. यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करताना बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे सरसकट अभ्यासक्रमात कपात करण्याची गरज आहे.
पुरुषोत्तम पंचभाई,
राज्य उपाध्यक्ष, राष्ट्रवादी शिक्षक संघ 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT