money 
नागपूर

दिलासा... शिक्षकांना एप्रिलचे वेतन मिळणार  

सकाळवृत्तसेवा

नागपूर : राज्यातील शिक्षकांना एप्रिल महिन्याचे वेतन देण्यासाठी निधी कमी पडत असल्याची बाब समोर येत होती. याबाबत भाजपा शिक्षक आघाडीने याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून अखेर निधी मंजूर करवून घेतल्याने राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन मिळणार असल्याची माहिती विदर्भ सहसंयोजक अनिल शिवणकर दिली. 

सरकारकडून एप्रिल महिन्याचे वेतन देण्याचे जाहीर केले होते. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याच्या वेतनासाठी केवळ अर्धाच निधी उपलब्ध होता. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन कसे होतील असा प्रश्न निर्माण झाला होता. वेतन अधीक्षक कार्यालयांनी शाळांना एप्रिल महिन्याची देयके जमा करायला सांगितले होते. शाळांकडून वेळेत ही देयके जमा करण्यात आली.
अमेरीकेनंतर या जिल्ह्यातील वाघिणीला केले क्‍वारंटाइन, राज्यातील पहिलीच घटना

याबाबत भाजपा शिक्षक आघाडीने एप्रिल रोजी वित्त विभागाचे सचिव, शालेय शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालकांकडे मेल करून तातडीने वेतन अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यावरुन माध्यमिक शिक्षण संचानालयाने वेतन अनुदान मंजूर झाल्याच्या लेखी सूचना राज्यातील शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षकांना दिल्या. त्यामुळे एप्रिल महिन्याचा वेतनाचा प्रश्न सुटला आहे. आता शिक्षकांना मागील वेतानासारखा विलंब होणार नसल्याने शिक्षकांना वेळेवर पगार मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT