Temperature sakal
नागपूर

Temperature : चटके वाढले, पारा ४३ पार; नागपूर @ ४०.४, अकोला @ ४३.४

विदर्भात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - विदर्भात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. नागपूरचे तापमान शुक्रवारी अपेक्षेप्रमाणे वाढून ४०.५ अंशांवर गेले, तर अकोल्यात सर्वाधिक ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. शनिवारपासून यलो अलर्ट असल्यामुळे उन्हाच्या झळा आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या तीन दिवसांपासून ऊन व तापमानात सातत्याने वाढत आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे गुरुवारी नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली. उष्णलाटेचा विदर्भात सगळीकडेच प्रभाव दिसला. गुरुवारी ३९.९ अंशांवर असलेला नागपूरचा पारा आज ०.६ अंशांनी चढून ४०.५ अंश सेल्सिअसवर गेला.

तर अकोल्याच्या तापमानातही एका अंशाची वाढ होऊन पारा ४३.४ अंशांवर स्थिरावला. येथे नोंद झालेले कमाल तापमान विदर्भात सर्वाधिक, तर मालेगाव (४३.८ अंश सेल्सिअस) संपूर्ण राज्यात दुसरे उचांकी ठरले. याशिवाय ब्रम्हपुरी (४३.१ अंश सेल्सिअस), गडचिरोली (४२.८ अंश सेल्सिअस), व चंद्रपूर (४२.८ अंश सेल्सिअस), वाशीम (४२.४ अंश सेल्सिअस) आणि वर्धा (४२.० अंश सेल्सिअस) येथेही उन्हाचे तीव्र चटके जाणवले.

प्रादेशिक हवामान विभागाने शनिवारपासून यलो अलर्ट जारी केल्याने चटके आणखी वाढणार आहे. त्याचवेळी सात तारखेपासून काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सावधगिरी बाळगावी

नागपूर व विदर्भात सकाळी आठ-नऊपासूनच ऊन तापणे सुरू होते. त्यामुळे घराबाहेर पडण्याची हिंमत होत नाही. तीव्र उन्हामुळे पंखे व कुलरसुध्दा सध्या प्रभावहिन ठरत आहेत. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडताना भरपूर पाणी पिऊनच बाहेर पडावे. डोके व चेहरा सुती कापडाने झाकावा आणि फळांचे भरपूर प्रमाणात सेवन करावे असे आरोग्यतज्ज्ञ सांगत आहेत.

विदर्भातील तापमान

शहर - तापमान

नागपूर - ४०.५

अमरावती - ४२.६

वर्धा - ४२.०

अकोला - ४३.४

बुलडाणा - ३९.५

यवतमाळ - ४१.०

गोंदिया - ३९.४

ब्रह्मपुरी - ४३.१

वाशीम - ४२.४

चंद्रपूर - ४२.८

गडचिरोली - ४२.८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT