Ten year old boy dies in Jaripatka at Nagpur
Ten year old boy dies in Jaripatka at Nagpur 
नागपूर

जीवनावश्‍यक असल्याने सुरू होते किराणा दुकान; पत्नी गेली पतीच्या मदतीला अन्‌ मुलगा...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आजकाल प्रत्येकाच्या घरी पाळणा असतो. फावल्या वेळेत घरातील लहान मुलं आणि वयोवुद्ध पाळण्याचा वापर करीत असतात. अनेकजण पाळण्यावर बसून चहाची चुसकी घेत असतात. आता तर उन्हाळाच सुरू झाला आहे. या दिवसांत पाळण्याचा वापर अधिकच होतो. अशाच एका पाळण्याने कुणाचा जीव जाईल असा कोणी विचारच कोणी करले का? मात्र, अशी एक दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यातील जरीपटका परिसरात घडली. यात दहा वर्षीय चिमुकल्याचा जीव गेल्याने हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक गौरव असनानी असे मृत मुलाचे नाव आहे. कार्तिक हा पाचव्या वर्गात शिकत होता. उन्हाळ्यामुळे शाळेला सुटी असल्याने तो घरी होता. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू असल्याने त्याला घराबाहेरही निघता येत नव्हते. तो लहान असल्याने बाहेर खेळण्यासाठी हट्ट करीत होता. मात्र, आई-वडील त्याला बाहेर जाऊ देत नव्हते.

31 मार्चला कार्तिक हा घरातच खेळत होता. पाळण्यासाठी त्याने आलमारीला दोरी बांधली. यानंतर झोका घेण्यासाठी त्याने दोरीवर उडी घेतली. मात्र, तोल गेल्याने दोरी त्याच्या गळ्यात अडकली. दोरी गळ्याला आवळल्या गेल्याने तो तडफळत होता. मात्र, आई-वडील घरी नसल्याने कुणाचेही याकडे लक्ष गेले नाही. काही वेळानी तो बेशुद्ध झाला. 

काही वेळानी कार्तिकचे वडील गौरव घरी आले आणि त्यांनी कार्तिकला हाक दिली. मात्र, गौरव यांना कार्तिकचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी खोलीत जाऊन बघितले असता कार्तिकच्या गळ्याला दोरीचा फास लागलेला दिसला. गौरव यांनी फास काढून तत्काळ कार्तिकला मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान कार्तिकचा मृत्यू झाला. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने असनानी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. कार्तिकच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

देशात लॉकडाऊन सुरू असल्याने कुणालाही घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे. फक्‍त जीवनावश्‍यक वस्तूंचे दुकान सुरू आहेत. गौरव यांचा किराणा व्यवसाय असल्याने त्यांचे दुकान सुरू आहे. लवकरात लवकर ग्राहकांना सेवा देता यावी म्हणून कार्तिकचे आई-वडील दुकानात काम करीत होते. घरी मुलाला फास लागल्याची त्यांना कल्पनाच नव्हती. कार्तिकच्या मृत्यूप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

'चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून श्रीलंकेत हलवणार…?' दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर नेटकऱ्यांनी घेतली मजा

The Patna-Kota Express Train: स्टेशन मास्तरला झोप लागली अन्.. अर्धा तास हॉर्न वाजवत राहिला ट्रेनचालक

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Kangana Ranaut : ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिका

SCROLL FOR NEXT