ग्रामपंचायतींनी केलेले बंदिस्त नाली बांधकाम. 
नागपूर

कोरोनाकाळात निधी परत जाण्याच्या भीतीने केले थातूरमातूर बांधकाम

संदीप गौरखेडे

कोदामेंढी (जि.नागपूर) : कोरोनाकाळात सगळी कामे ठप्प आहेत . ज्याच्या त्याच्या तोंडी केवळ कोरोनाशिवाय दुसरा विषयच नाही. परंतू काही जण मात्र कोरोनाचे निमित्त शोधून माल कसा हडपता येईल, याच प्रयत्नात असतात. आता हेच बघाना ग्रामपंचायतला आलेला शासकीय निधी कोरोनाकाळात परत जाऊ नये म्हणून काही महाभाग डोके लढवित असल्याचे त्यांचा कृतीतून आढळले. मलिंदा कसा लाटायचा, याचे शिकवणी वर्ग भल्याभल्यांना लावावे लागतील.‍

 जिल्हा वार्षिक योजना आणि चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून मौदा तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीने बंदिस्त नालीचे बांधकाम केले. कोरोनामुळे निधी परत जाण्याच्या भीतीने थातूरमातूर निकृष्ट दर्जाचे बंदिस्त नालीचे बांधकाम करण्यात आले. नाली बांधकामाची चौकशी करण्याची मागणी करीत (ता. ११ ऑगष्ट) रोजी 'सकाळ' मध्ये वृत्त देखील प्रकाशित करण्यात आले होते. याबाबत मौदा पंचायत समितीच्या एका अधिकाऱ्यांना दोनदा नव्हे तर तीनदा विचारणा केली असता पूररग्रस्तांचे सर्व्हेक्षण सुरु असून केंद्राची चमू येणार आहे. मी बघतो, असे उत्तर देत झटकण्याचे काम केले. यावरून तालुक्यातील ग्रामपंचायतीमार्फत गावात केलेले बंदिस्त नाली बांधकामाला अधिकाऱ्यांचेच गालबोट लागल्याचे दिसून येते.

अधिक वाचाः कोरोनाबळींच्या अंत्यसंस्कारासाठी शुल्क वसुली, नातेवाईकांची ऐनवेळी पैशासाठी धावाधाव
 

चौकशी करण्यात अधिकाऱ्यांची उदासीनता
एखादे बांधकाम म्हटले की अधिकारी आणि पदाधिकारी यांची टक्केवारी ठरलेली असते. त्यामुळे गावातील एखाद्याने तक्रार करावी कुणाकडे आणि  केली तरी त्याचे निराकरण होत नाही. तालुक्यात ६३ ग्रामपंचायती असून १२४ गावे समाविष्ट आहेत. बंदिस्त नालीचे बांधकाम करण्यात आले, मात्र निधी परत जाऊ नये तसेच कामे केली नाही तर कमाई आणि कमिशन मिळणार नाही, या नादात बंदिस्त नाली बांधकामाचा सपाटा लावण्यात आला. नालीचे बांधकाम करताना पावसाचे पाणी आणि सांडपाणी कुठे मुरणार, तसेच कुठे भरणा होणार, याचे नियोजन करण्यात आले नाही. खोदकाम करून सिमेंट काँक्रेटिंग न करता पायल्या टाकण्यात आल्या. काही ठिकाणी पायल्या जोडण्याकरिता कॉलरचा वापर न करता प्लास्टिकच्या चुंगड्या वापरण्यात आल्या. मळणी होण्याकरिता मुरूम आणि वाळूचा वापर न करता चिखल आणि मातीचा वापर करण्यात आला. पावसाचे पाणी नालीद्वारे वाहून न जाता रस्त्यावर ठिकठिकाणी साचू लागले आहे . नाली बांधकाम केले मात्र सांडपाणी शेवटच्या टोकापर्यंत जाण्यासाठी मार्ग मोकळा न केल्याने तुडूंब भरलेले आहे. त्यामुळे रोगराईला जणू निमंत्रण देण्यासारखे झाले आहे.
अधिक वाचाः मुलानेच संपविले जन्मदात्याचे आयुष्य

चौकशी केल्यास पितळ उघडे पडेल
 अनेक गावात अशाप्रकारे बोगस आणि निकृष्ट बांधकाम करण्यात आले आहे. अधिक मलिंदा लाटण्याच्या नादात विकासाच्या नावाखाली बोगस कामे करण्यात आली आहेत. बंदिस्त नाली बांधकामाची चौकशी केल्यास सर्वांचे पितळ उघडे पडणार आहे. मात्र त्यांना देखील पदाधिकारी आणि अधिकारी यांची साथ असल्याने याकडे मुद्दामहून दुर्लक्ष केले जात आहे. मौदा पंचायत समितीच्या अभियंत्यांची कामावर देखरेख असायला हवी होती. मात्र त्यांनी बांधकामाच्या कोणत्याही तांत्रीक बाबीकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे अशाप्रकारे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले. त्यांच्याशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.  

अंदाजपत्रकानुसार बांधकाम झाले नाही
माथनी येथे अंदाजपत्रकानुसार बांधकाम झाले नसल्याचे चौकशीत आढळले. पुढील ग्रामपंयतीच्या नाली बांधकामाची देखील चौकशी करतो.
दयाराम राठोड, खंडविकास अधिकारी

संपादनः विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: मुंबईचं राजकारण हादरलं! उद्धव–राज ठाकरे युतीचा गुप्त फॉर्म्युला समोर, थेट संघर्ष होणार... महायुतीची तातडीची बैठक!

Kidney Racket : रामकृष्णने विकल्या १६ जणांच्या किडन्या; पोलिस तपासात खळबळजनक खुलासा, दोन साथीदारांचा शोध सुरू

Winter Digestion Issues: हिवाळ्यात पचनसंस्थेच्या समस्यांवर करा मात!आहारात तंतुमय पदार्थ आणि पुरेसे पाणी पिणे गरजेचे- डॉक्टरांचा सल्ला

Success Story: 19 व्या वर्षी साक्षी राहिंज इंडियन एअर फोर्समध्ये; पिंपरणेच्या लेकीची आकाशाला गवसणी, स्वप्न उतरवलं सत्यात!

हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला ११ कोटींचा दंड, राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांनीच मोडला नियम

SCROLL FOR NEXT