आशिया खंडातील पहिला चार मजली पूल नागपुरात sakal
नागपूर

नागपूर : आशिया खंडातील पहिला चार मजली पूल नागपुरात

लोखंडी ढाचा तयारः मेट्रो मार्गावर करणार उभा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महामेट्रोने अप्रतिम कलाकृतीने शहराच्या आकर्षणात भर घातली. महामेट्रो कामठी रोडवर गड्डीगोदाम येथे चार मजली पूल तयार करीत असून त्यासाठी लोखंडी ढाचा तयार करण्याचे काम बुटीबोरी एमआयडीसीमध्ये अंतिम टप्प्यात आहे. हा चार मजली पूल आशिया खंडातील पहिलाच असल्याचा दावा कंपनीने केला असून त्याचा ढाचा तयार करण्यात येत आहे. या पुलासाठी १ हजार ६३४ टन लोखंडाचा वापर करण्यात आला आहे.

सीताबर्डी ते कामठी मेट्रो मार्गावर झिरो माईल स्टेशनपर्यंत मेट्रो धावत आहे. त्यापुढील कामेही अंतिम टप्प्यात असून याच मार्गावर गड्डीगोदाम रेल्वे पुलावरून मेट्रो तसेच चारचाकी वाहतूक धावणार आहे. येथे चारमजली पूल तयार होणार आहे. जमिनीवरून जड वाहतूक, त्यावर भारतीय रेल्वे धावणार आहे. त्यानंतर चारचाकी वाहतूक व त्यावर मेट्रो धावणार आहे. हा पूल पूर्णपणे लोखंडी असून बुटीबोरी

येथील एमआयडीसीतील एका खासगी कंपनीमध्ये पुलाचे ट्रायल असेंब्लिंग (पूल उभा करण्याचे प्रात्यक्षिक) सुरू आहे. कंपनीच्या परिसरात जमिनीपासून २४ मीटर उंच, ८० मीटर लांब व १८ मीटर रुंद लोखंडाचा ढाचा दिसून येत आहे. या पुलाच्या ढाच्याबाबत येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी मेट्रोच्या गड्डीगोदाम येथे चारमजली पुलाचे स्ट्रक्चर तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. दरम्यान, गड्डीगोदाम येथील या चारमजली पुलाचे कामाचे डिझाईन बदलविण्यात आले आहे. त्यामुळे नव्या डिझाईनचा हा पूल शहरासाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.

पाऊण लाख नटबोल्टचा वापर चारमजली पुलाचा ढाचा जोडण्यासाठी ७८ हजार बोल्टचा वापर करण्यात आला आहे. या बोल्टला ‘हाय स्ट्रेन्थ फ्रिक्शन ग्रीप’ असेही म्हटले जाते.

२४ मीटर उंचावरून धावणार मेट्रो

गड्डीगोदाम येथे महिनाभरात चारमजली पुलाचा ढाचा दोन पिलरवर बसविण्यात येईल. जमिनीपासून २४ मीटर उंचावर मेट्रो ट्रॅक राहणार आहे. त्याखाली, अर्थात जमिनीपासून १४ मीटर उंचावर चारचाकी, दुचाकीसाठी रस्ता, त्याखाली भारतीय रेल्वेचे ट्रॅक राहणार असून जमिनीवरून जड वाहतूक धावणार आहे.

१०० वर्षे आयुष्य

या लोखंडी पुलाचे आयुष्य शंभर वर्षे असेल, असे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अंकित चोखानी यांनी सांगितले. गेल्या साडेतीन महिन्यांपासून १५४ कर्मचारी पुलाचे प्रत्येक सुटे भाग तयार करीत असून ५४ तज्ज्ञ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूल उभारल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC चा मोठा प्लॅन! फ्लायओव्हरमुळे प्रवासात २५ मिनिटांची बचत होणार, कुठून कुठे बांधणार? जाणून घ्या मार्ग...

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी बॅटमध्ये 'AI Chip' लावून खेळतोय! पाकड्यांच्या पोटात दुखतंय, उलटसुलट आरोप करत सुटलेत...

LPG Cylinder Rules 2026 : १ मे पासून एलपीजी गॅसचे नियम बदलणार, कधी बुक करता येईल सिलिंडर? महत्त्वाची अपडेट समोर

१३२ किलोवरून थेट ६५ किलोवर! फू बाई फू फेम आरती सोलंकीनं पाणी पुरी खाऊन बदलल्या 'या' सवयी

Latest Marathi News Live Update : कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या राज्यव्यापी संपात वणीतील विक्रेते सहभागी

SCROLL FOR NEXT