नागपूर

प्रेमप्रकरण आले उघडकीस : वडिलांच्या भीतीपोटी मुलीने काढला पळ

अनिल कांबळे

नागपूर : प्रियकराचे वारंवार फोन येत असल्यामुळे वडिलांना मुलीवर संशय (The father suspects the daughter) आला. त्यामुळे त्यांनी तिचा चांगला क्लास घेतला. परंतु, ती प्रेमप्रकरणाबाबत (love affair) बोलायला तयार नव्हती. शेवटी तिने शेजारी राहणाऱ्या मुलीला सोबत घेऊन घरातून पळ काढला. ही घटना कोराडी परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेने परिसरातील रहिवाशी व पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. (The girl fled out of fear of father in Nagpur)

मंगळवारी सायंकाळी १७ वर्षीय मुलीचा मोबाइल वारंवार वाजत होता. तिच्या वडिलांना संशय आला. त्यांनी तिला विचारणा केली. शेजारी राहणारी १३ वर्षीय मुलगी सतत फोन करीत असल्याचे तिने वडिलांना सांगितले. वडिलांना संशय आला. ते शेजारी राहणाऱ्या मुलीला विचारणा करण्यासाठी गेले. याचदरम्यान १७ वर्षीय मुलीने १३ वर्षीय मुलीला वडील येत असल्याचे सांगितले.

११ वर्षीय मुलगी घरून बेपत्ता झाली. याचदरम्यान संधी साधून १७ वर्षीय मुलीनेही घरून पलायन केले. तिचे वडील घरी आले असता मुलगी बेपत्ता दिसली. दोघींच्या नातेवाइकांनी शोध घेतला. त्या आढळून आल्या नाहीत. अखेर कोराडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलींचा शोध सुरू केला आहे. मुलीचे प्रेमप्रकरण असून ती प्रियकराचे नाव सांगत नाही. प्रियकराला मारहाण करून प्रेमसंबंध तोडण्याची धमकी देणार असल्याची कल्पना मुलीला असल्यामुळे तिने मैत्रिणीसह पळ काढल्याची चर्चा आहे.

(The girl fled out of fear of father in Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

Pune Accident: पुण्यातील मुथाळणे घाटात शेतमजूरांची पिकअप पलटली; एक गंभीर तर १८ किरकोळ जखमी!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT