नागपूर

चित्रपटातील हिरो खऱ्या आयुष्यात खलनायक! मोबाईल चोरीत अडकला

योगेश बरवड

नागपूर : नशिबाने त्याला चक्क एका चित्रपटात कामाची संधी मिळवून दिली. दिग्गज अभिनेत्यासोबत त्याने काम केले. त्याच्यामुळेच फुटबॉलचा सामना जिंकता आल्याचा प्रसंग चित्रित करण्यात आला आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मोबाईल चोरीच्या (Mobile theft) प्रकरणात त्याला अटक झाली आणि चित्रपटातील हा हिरो (The hero in the movie) खऱ्या आयुष्यात मात्र खलनायक (A villain in real life) ठरला. लोहमार्ग पोलिसांनी अटक केलेल्या प्रियांशू क्षेत्रीचा खरा चेहरा समोर आला आहे. (The-hero-in-the-movie-is-a-villain-in-real-life)

ख्रिश्चन कॉलनीतील रहिवासी आणि उत्कृष्ट फुटबॉलपटू प्रियाशू मित्रांमध्ये बाबू नावानेच ओळखला जातो. आई-वडिलांना तो एकटा मुलगा असून, तीन बहिणी आहे. अलिकडेच नागपुरात चित्रित झालेल्या बहुप्रतीक्षित चित्रपटात त्याला कामाची संधी मिळाली. या कामाचे मानधनही त्याला मिळाले. पण, वाईट संगतीमुळे तो व्यसनाधीन झाला. शौक पूर्ण करण्यासाठी चक्क रेल्वेत मोबाईल चोरी करू लागला.

रेल्वे स्थानकावरून रवाना होणाऱ्या गाड्यांची गती आउटरवर कमी असते. अनेक प्रवासी गेटजवळ उभे राहून नातेवाइकांना गाडी सुरू झाल्याची वार्ता देत असतात. त्याचवेळी प्रियांशू हाती काठी घेऊन उभा असायचा. बोलणाऱ्याच्या हातावर काठी हाणून मोबाईल खाली पाडायचा आणि तो पळवून न्यायचा अशी त्याची कार्यपद्धती.

सत्येंद्र नावाचा साथीदार पडलेल्या मोबाईलवर लक्ष ठेवायचा. चोरलेले मोबाईल ते शुभमकडे जमा करायचे. ग्राहक शोधायची जबाबदारी शुभमकडेच होती. तिन्ही चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाच्या आदेशाने त्यांना ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

(The-hero-in-the-movie-is-a-villain-in-real-life)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत आज ठाकरेंचा मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही सहभागाची शक्यता

Electric Shock Farmer: दुष्काळात भातपीक वाचवण्याची धडपड ठरली जीवघेणी; शेतात पाणी देताना वीजप्रवाहाच्या संपर्कात येऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Horoscope 2027: २०२७ ठरणार खास! नोकरी, व्यवसाय अन् पैशांच्या बाबतीत मिळू शकतात मोठ्या संधी; ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार म्हणे

Sunetra Pawar: ‘स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवा, अजितदादांचं नाव वापरू नका’; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना टोला

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

SCROLL FOR NEXT