SACHIN PILGAVKAR
SACHIN PILGAVKAR SAKAL
नागपूर

चाहत्‍यांचे प्रेम हेच माझ्या तारुण्‍याचे रहस्‍य ; सचिन पिळगावकर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : चाहत्‍यांकडून जे प्रेम मिळते, तिच माझी उर्जा आहे. तोच माझा ओमकार आहे. मी योग करत नाही तर भरपूर बॅडमींटन खेळतो, लोकांना हसवतो, स्‍वत: हसतो, मुलांसोबत भरपूर खेळतो, त्‍यामुळेच मी अजुनही तरुण दिसतो, असे स्‍वत:च्‍या तारुण्‍याचे रहस्‍य अभिनेते सचिन पिळगावकर यांनी उलगडले.

सचिन पिळगांवकर यांच्‍या दिलखुलास गप्‍पा, त्‍यांच्‍या तडफदार गप्‍पांनी नागपूरकरांची जिंकली आण‍ि शहराच्‍या सांस्‍कृतिक विश्‍वात नवचैतन्‍य फुंकले. ‘अख‍ियों के झरोखों से’ या कार्यक्रमातील दृष्‍टीहिन कलाकारांच्‍या अदाकारीला सलाम करत सचिनने त्‍यांच्‍या गायन वादनाच्‍या आनंद लुटला.

ऑस्‍कर सांस्‍कृतिक संगीत कला अकादमीच्‍या बॅनरखाली चेतन सेवांकुर ऑर्केस्‍ट्रा ग्रुप वाशीम यांची प्रस्‍तुती असलेला ‘अखियों के झरोखो से’ हा कार्यक्रम कविवर्य सुरेश भट सभागृहात शनिवारी सादर करण्‍यात आला. सुप्रसिद्ध अंध गायक पद्मश्री डॉ. रविंद्र जैन यांना 6 व्‍या पुण्‍यतिथीनिमीत्‍त अभिवादन करण्‍यासाठी मिलान ग्रुप, एनएमसी, नागपूरची संकल्‍पना व आयोजन असलेल्‍या या कार्यक्रमात दशरथ जोगदंड, विकास गडेकर, कोमल खांडेकर आण‍ि अश्विनी पवार या दृष्‍टीहिन गायकांनी एकाहून एक उत्‍तम गीते सादर केली. त्‍यांना कीबोर्डवर चेतन उचितकर, ड्रमवर विजय खडसे, ऑक्टोपॅडवर अमोल गोडघासे आणि तबल्‍यावर रामेश्वर बाम्बले या दृष्‍टीहिन गायकांनी उत्‍तम साथसंगत केली. त्‍यांच्‍या साथीला अरविंद उपाध्याय, मंगेश पटले, नंदू गोहाने, अमर शेंडे, दीपक कांबळे, अशोक टोकलवार, मनोज विश्वकर्मा, प्रशांत भिंगारे आणि मिस रक्षंदा होते.

कार्यक्रमाची सुरुवात मंगल भवन या गीताने सर्व कलाकारांनी एकत्रितपणे केली. नवरात्रोत्‍सवाच्‍या मुहूर्तावर देवीला वंदन करण्‍याकरिता लेके पुजा की थाली हे गीत गायकांनी सादर केले. सचिन पिळगावकर यांचे मंचावर आगमन होताच सभागृहात टाळ्यांच्‍या कडकडाट झाला. डॉ. महेश तिवारी यांनी त्‍यांची मुलाखत घेतली. सचिन यांनी यांनी यावेळी बडे अच्‍छे लगते है हे गीत सादर केले.

गीत गाता चाल, अखियों के झरोको से, फकिरा चल चला चल, चोरीचा मामला, धरजी तेरी माता, अशी विविध मराठी हिंदी गीते गायकांनी सादर केली. राष्‍ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

राजू व्‍यास, चेतन सेवांकूर व धनराज राऊत यांच्‍या फेसबुक पेजवरून लाईव्‍ह करण्‍यात आलेल्‍या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश तिवारी व रेखा चौधरी यांनी केले. रिषभ, मायकेल, राजेश अमीन व विनोद अग्रवाल यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.

पालकांनी मुलांची काळजी घ्‍यावी

बॉलिवुडमध्‍ये सध्‍या गाजत असलेल्‍या ड्रग्‍ज प्रकरणावर भाष्‍य करताना सचिन म्‍हणाले, जे फिल्‍म जगतात घडते ते समाजातही मोठ्या प्रमाणात घडत असते. त्‍यामुळे देशातील सर्वच पालकांनी आपल्‍या मुलांची काळजी घेणे, त्‍यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

मला सचिन व्‍हायचे होते

माझ्या वडिलांना मी राजकपूर व्‍हावे, असे वाटत होते पण राजकपूर बनने सोपे काम नाही. राजकपूर एकच असून शकतो. त्‍यामुळे मी वडिलांना सांगितले, मला सचिन पिळगावकर व्‍हायचे आहे, राजकपूर सारखा मला आदर्श प्रस्‍थापित करायचा आहे. सचिन यांनी यावेळी अनेक आठवणींना उजाळा दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case : केजरीवालांच्या निवासस्थानातून पोलिसांनी CCTV DVR केलं जप्त; पुरावे गोळा करुन टीम रवाना

Nashik Lok Sabha Election : नाशिककरांनो, निर्भयपणे मतदान करा! पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे सोशल मीडियावरून आवाहन

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीने केल्या सर्व मर्यादा पार, अश्लील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

SRH vs PBKS Live Score : पंजाबची 150 धावांपर्यत मजल; प्रभसिमरनला बाद करत व्यशकांतने दिला धक्का

SCROLL FOR NEXT