कन्‍हान पोलिस ठाण्याच्या आवारातून तारांची चोरी esakal
नागपूर

Nagpur Crime News : कन्‍हान पोलिस ठाण्याच्या आवारातून तारांची चोरी

Crime News : एक चोरटा ताब्यात तर दोघे झाले पसार

सकाळ डिजिटल टीम

Nagpur : लोकांचे रक्षण आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा करण्याचा दावा पोलिस करीत असले तरी प्रत्यक्ष पोलिस ठाण्यातच चोरी झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका चोरट्यास अटक केली तर दोघे पसार झाले आहेत. हा प्रकार शनिवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण, पोहवा सचिन वेळेकर विभागातील गस्तीकरिता रवाना झाले. खापरखेड़ा पोलिस ठाण्यात भेट देऊन शनिवारी (ता.११) मे रोजी पहाटेच्या दरम्यान पोलिस स्टेशन कन्हानकडे निघाले.

जुन्या पोलिस ठाण्यात पोलिसांना संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यामुळे ठाण्यात जाऊन पाहणी केली तर तीन युवक खांद्यावर प्लॅस्टिकची बोरी घेऊन जाताना दिसले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या पाठलाग केला. आरोपींनी कार जवळ जाऊन प्लॅस्टिकची बोरी कारमध्ये टाकत असताना एकाला ताब्यात घेतले. तर दोन युवकांनी पळ काढला.

पोलिसांच्या ताब्यात असलेला अक्षय राजू गडकरी (वय २६) रा.कामठी व पळून गेलेले युवकांचे नाव गोलू ऊर्फ अमीर खान, विशाल वैरागडे दोन्ही रा.कामठी रहिवासी आहे .पोलिसांनी कारमध्ये ठेवलेली पांढऱ्या बोरीची पाहणी केली. त्यात जुन्या ठाण्याचा आवारात ठेवलेला ॲल्युमिनियमची तार दिसून आली.

आरोपी अक्षय गडकरीला ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून ॲल्युमिनियमची तार अंदाजे २० किलो, का,र असा मुद्देमाल जप्त केला. तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण, सचिन वेळेकर करीत आहेत. फरार आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.

कन्हानमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

नागपूर ग्रामीणमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी शेतातील विद्युत पंप आणि इतर साहित्य चोरीला जात होते. कन्हान परिसरातील शेतातून लोखंडी सळाखी चोरून नेल्या होत्या. तर कोळसा चोरट्यांचा हैदोस नेहमीचाच झाला आहे. कन्हान परिसरात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. आता पोलिस ठाण्यातील साहित्य चोरीला जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT