Theft of GST of Rs 2.5 crore 
नागपूर

धक्‍कादायक... अडीच कोटींच्या जीएसटीची चोरी 

राजेश रामपूरकर

नागपूर : वस्तू व सेवाकर गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर विभागीय कार्यालयाने सलग दुसऱ्या दिवशी एक देशी दारू उत्पादन करणाऱ्याच्या बॉटलिंग कारखान्यावर जीएसटी चोरी व खोटे इनपुट टॅक्‍स क्रेडिट प्राप्त केल्याप्रकरणी छापा टाकून कारवाई केली. दरम्यान, कागदपत्राची तपासणी केली असता 2 कोटी 55 लाखांच्या जीएसटीची चोरी केल्याचे उघडकीस आले. 

दारूची निर्मिती करणारी कंपनी बंगळूर आणि औरंगाबाद येथील आघाडीच्या दारूची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे कंत्राटी पद्धतीने बॉटलिंगचे काम करीत होते. तेथे सुधारित स्पिरीट आणि पाण्यात पदार्थ टाकून संबंधित ब्रॅण्ड ओनर्सच्या नावाने देशी दारू तयार केली जात होती. संपूर्ण काम हे कारखान्यांच्या संचालकाच्या आदेशानुसार होत होते. बॉटलिंग कारखान्यांचे संचालक धारणाशुल्क दिल्यानंतर दारूवरील जीएसटीची चोरी केली जात होती. तसेच बॉटलिंग युनिटस इनपुट टॅक्‍स क्रेडिट घेत होते. 

यातील काही कामे बाहेरच्या व्यक्तीकडून करण्यात येत असताना जीएसटी भरण्यात येत नसल्याचे लक्षात आल्याने छापे टाकण्यात आले. दरम्यान, दोन कोटी 55 लाखांच्या जीएसटीची चोरी केल्याचे जप्त केलेल्या कागदपत्रावरून उघडकीस आले. त्यातील 1 कोटी 20 लाखांची रक्कम वसूल केली. उर्वरित 1 कोटी 35 लाखांचा जीएसटी लवकरच वसूल करण्यात येणार आहे. 
 

साडेतीनशे वाहनचालकांवर कारवाई 


कोरोना काळात नियमांकडे कानाडोळा करीत बेफाम फिरणाऱ्या वाहनचालकांना अटकाव घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम आरंभली आहे. गुरुवारी एकाच दिवशी 287 मोटारसायकलचालक, 56 कारचालक व 6 ऑटोचालक अशा एकूण 349 वाहनचालकांविरुद्ध लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून चालान करण्यात आले. याशिवायही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 1 हजार 279 वाहनचालकांविरुद्ध कारवाई करीत त्यांच्याकडून 4 लाख 43 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात नियम मोडल्याप्रकरणी आतापर्यंत 3 हजार 532 मोटारसायकलचालक, 711 कारचालक व 197 ऑटोरिक्षाचालक अशा एकूण 4 हजार 440 वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : केंद्र सरकारचे लक्ष पुरवठा साखळीवर

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT