Theft at the home of a police officer Nagpur crime news 
नागपूर

घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा शहरात धुडगूस; पोलिस अधिकाऱ्याच्या घरीच केली चोरी

अनिल कांबळे

नागपूर : घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी शहरात धुडगूस घातला आहे. शहरात एका दिवसात सरासरी दोन ते तीन घरफोडीचे गुन्हे दाखल होतात. आता तर पोलिस अधिकाऱ्यांचेही घरे सुरक्षित राहिलेले नाही. चोरट्यांनी थेट उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याकडे घरफोडी करून रोख रकमेसह सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. राजा पवार असे पोलिस अधिकाऱ्यांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा पवार यांची नुकतीच पदोन्नतीवर राजुरा येथे बदली झाली. ते राजुरा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी आहेत. बदली झाल्याने पवार हे कुटुंबासह राजुरा येथे राहतात. त्यांचे वडील शेरासिंग गुलाबसिंग पवार (वय ८२) हे नागसेननगरमध्ये राहतात. सकाळ आणि सायंकाळी ते राजा पवार यांच्या घरी जातात.

संधी साधून चोरट्याने राजा पवार यांच्या घराचे कुलूप तोडले. आलमारीतील मंगळसूत्र, सोनसाखळी, सोन्याची अंगठी व २० हजारांच्या रोख रकमेसह सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरी केला. बुधवारी सकाळी शेरासिंग हे कुशीनगर येथील राजा पवार यांच्या घरी आले असता घरफोडीची घटना उघडकीस आली.

पोलिस अधिकाऱ्याकडे घरफोडी झाल्याचे कळताच जरीपटका पोलिसांमध्ये खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. जरीपटका पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या अधिकाऱ्याच्या बाजूलाच निवृत्त सहायक पोलिस आयुक्तांचेही निवासस्थान आहे, हे विशेष...

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT