There is no record of work done by the police on weekends 
नागपूर

पोलिसांची सोशल मीडियावर खदखद : साप्ताहिक सुट्यांचा ‘वांदा’; गृहमंत्रालयाच्या आदेशाला हरताळ

अनिल कांबळे

नागपूर : पोलिसांना साप्ताहिक सुटीच्या दिवशी कर्तव्यावर हजर होण्याचा आदेश वरिष्ठांनी दिल्यास त्या दिवशीचे अतिरिक्त वेतन देण्याचे निर्देश आहेत. तरीही नागपूर शहर आयुक्तालयातील अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी साप्ताहिक सुटीच्या दिवशी कर्तव्यावर बोलवतात. परंतु, या सेवेची कुठेही नोंद होत नाही तसेच अतिरिक्त वेतनही देण्यात येत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या मनातील खदखद सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण तसेच विविध धार्मिक सण जसे गणेशोत्सव, ईद, नवरात्रोत्सव, होळी, दिवाळी तसेच राजकीय स्तरावरील महत्वाच्या व्यक्तींची वरचेवर राज्यातील विविध शहरात भेटी होत असतात.

अशा विविध कारणांस्तव पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना बंदोबस्तासाठी कर्तव्याचा कालावधी बरेचदा १२ तासांपेक्षा जास्त काळ बंदोबस्त करावा लागतो. अपुऱ्या मनुष्यबळामुळे राज्यातील पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्या साप्ताहिक सुट्या रद्द केल्या जातात.

गृह विभागाच्या २००४ च्या निर्णयानुसार पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात मूळ वेतन आणि दैनिक भत्ता दिला जातो. मात्र, सध्या नागपूर आयुक्तालयात कार्यरत अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटीच्या दिवशी कर्तव्यावर बोलावले जाते. मात्र, त्या कर्तव्याची कुठेही नोंद होत नाही तसेच मूळ वेतनाप्रमाणे एका दिवसाचा पगारही दिला जात नसल्याची माहिती समोर आली आहे.

कर्मचाऱ्यांना कौटुंबिक ताण

कर्मचारी साप्ताहिक सुटीच्या दिवशी घरातील कामे, नातेवाईक आणि मुलांना वेळ देतात. मात्र, अचानक वरिष्ठांचा हजर होण्याचा आदेश येत असल्याने कुटुंबाचा हिरमोड होतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कौटुंबिक ताण सहन करावा लागतो.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उमेदवारांची धडधड वाढली! उद्याची मतमोजणी पुढे ढकलली, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! 'या' तारखेला लागणार निकाल

Bogus Voting Kolhapur : कोल्हापुरातील गडहिंग्लज नगरपालिकेत बोगस मतदान, दुसऱ्याच्या आधार कार्डचा वापर करून मतदानाचा प्रयत्न

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरात चार दिवसांत पावणेपाच लाख भाविकांनी घेतले 'धर्म ध्वजेचे' दर्शन

Latest Marathi News Live Update : परतूरमध्ये ईव्हीएम बंद पडल्याने भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी

'त्या एका कृतीमुळे रणवीर सिंह विरोधात गुन्हा दाखल' चामुंडा देवीला 'भूत' म्हटल्याने हिंदू संघटना भडकली

SCROLL FOR NEXT