There will also be research to detain Corona; Proposal to go to state government 
नागपूर

कोरोनाला अटकाव करण्यासाठी इथेही होणार संशोधन; राज्य सरकारकडे जाणार प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देशात कोरोना विषाणूचे संक्रमण कोणालाही होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी जागतिक स्तरावर संशोधन सुरू झाले आहे. यात भारतही मागे नाही. वैद्यकीय संस्थांसह काही शैक्षणिक संस्था ही पुढे येत आहेत. त्यात आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हातभार लावत कोरोनावर संशोधन करण्यासाठी प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. येत्या दहा दिवसात राज्यसरकारला तसा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. सरकारने त्याला मंजूरी दिल्यास नागपूराचाही कोरोना संशोधनात हातभार राहणार आहे.

सध्या कोरोना या साथीच्या आजाराने पूर्ण जग हादरले आहे. जगात एक लाखाच्यावर लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतातही लोकांचा मृत्यू झाला आहे. जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर रुग्ण बरे झाले आहेत. रविवारपर्यंत नागपूरातही लोकांना बाधा झाली आहे. एकीकडे मराठवाडा विद्यापीठाने पुढाकार घेऊन त्यांच्या इंक्‍युबेशन केंद्रामध्ये 'कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा' तयार केली आहे. आता पाठोपाठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठही कोरोना आजाराच्या रोकथामसाठी प्रयत्न करणार आहे.


विद्यापीठाचे नवे प्रभारी कुलगुरु चांदेकर यांनी अशा प्रयोगशाळेसाठी इन्क्‍युबेशन सेंटरला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार या सेंटरमार्फत विद्यापीठाचे तज्ज्ञ प्राध्यापकांबरोबर खाजगी रुग्णालयातील डॉक्‍टर आणि विशेषज्ञ सूसज्ज प्रयोगशाळा असाव्यात याकरिता प्रस्ताव तयार करीत आहे. आठ दिवसात हा प्रस्ताव तयार होणार आहे. कोरोना या साथीच्या आजाराच्या संकटकाळी नागपूरात कोरोना संशयित मोठ्या प्रमाणात आढळले तर या प्रयोगशाळेच्या माध्यमातून आजाराची चाचणी आणि रोकथाम होण्याकरिता मोठा फायदा होणार आहे. मात्र त्याला सरकारने मान्यता दिली आणि पूर्ण सुविधा दिली तर हे शक्‍य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT