file 
नागपूर

या दलालांना आवरा रे कुणीतरी, घरकुलाच्या अनुदानासाठी चक्‍क गरीबांना मागतात पैसे...

संदीप गौरखेडे

कोदामेंढी (जि.नागपूर) : ज्यांची पडके घरे आहेत आणि ज्यांना राहण्यासाठी छत नाही, अशा गोरगरिबांसाठी शासनाची प्रधानमंत्री घरकुल आवास योजना आहे. या योजनेअंतर्गत शासन अडिच लाखाचे अनुदान देते. कामानुसार टप्प्याटप्प्याने अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जात आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने ते अडचणीत आहेत. अशा लाभार्थ्यांच्या संपर्कात जाऊन काही दलाल त्यांच्या अनुदानावर डल्ला मारीत असल्याचे पुढे आले आहे. मौदा तालुक्‍यात असे दलाल सक्रिय आहेत. रोजगारसेवक आणि काही राजकीय पक्षातील कार्यकर्ते असा गोरखधंदा करीत आहेत.

काय करतात हे दलाल?
प्रत्येक टप्प्यामागे पाच हजाराची रक्कम लाभार्थ्यांकडून वसूल करीत आहेत. पंधरा ते वीस हजार इतकी रक्कम दलालांच्या घशात गेल्यानंतर घराचे बांधकाम पूर्ण करण्याचे स्वप्न अपुरे राहत असल्याचे वास्तव आहे. संचारबंदीमुळे बांधकाम साहित्याच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. आणि त्यातही दलालांकडून पैशाची मागणी होत असल्याने घरांचे बांधकाम पूर्ण करावे कसे, असा पेच आहे. घरकुल बांधकामासाठी अडिच लाखांचे अनुदान असून झालेल्या कामाच्या आधारावर तीन टप्प्यात लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केल्या जाते. दोन महिन्यापासून कोरोनाच्या संचारबंदीमुळे बरेचशा लाभार्थ्यांचे घरकुलाचे बांधकाम अपुरे आहेत. महिन्याभरावर पावसाळा असल्याने राहावे कुठे, असा प्रश्न त्यांना सतावतो आहे.

घराचे स्वप्न पूर्ण होणार की नाही--
काहींचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील अनुदान अद्याप मिळाले नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. अनुदान प्राप्त करण्यासाठी कागदोपत्राची जुळवाजुळव करीत बॅंकेत आणि राजकीय नेत्याच्या दारी चकरा मारीत आहेत. अनुदान मिळवून देण्याच्या शर्तीवर दलाल लाभार्थ्यांकडून पैशाची मागणी करीत आहेत. "मरता क्‍या न करता' या ब्रिदनुसार लाभार्थी फसत आहेत. दलालांचा सपाटा, बांधकाम साहित्याच्या किमतीत वाढ, कोरोनाची संचारबंदी आणि पुढे पावसाळा अशा चक्रव्यूहात लाभार्थी भरडला जात आहे. त्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, याकडे शासन प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन अशा दलालांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

'ठरलं तर मग' मालिकेतील दोन अभिनेत्यांचा मुंबई लोकलने प्रवास; आला असा अनुभव, म्हणाले- एका स्टेशनवर पोलीस...

Numerology Insights: पहिल्याच भेटीत जिंकतात सर्वांचे मन! 'या' ३ मूलांकांचे लोक मानले जातात खरे 'सोशल बटरफ्लाय'!

SCROLL FOR NEXT