पारशिवनी : फसवणूक झाल्यानंतर खिशात गावाकडे जाण्यासाठी भटकत असलेले मजूर सामाजिक कार्यकर्त्यांनी आश्रम दिल्यानंतर जेवण करीत असताना.  
नागपूर

ते' खिशात पैसा नसताना उपाशीपोटी शोधत होते गावाकडचा रस्ता, मग घडले असे...

रूपेश खंडारे

पारशिवनी (जि.नागपूर):  कोरोना व्हायरस जिवघेणा असला तरी त्याहीपेक्षा जिवाला मनस्ताप देणारा प्रकार समाजात नेहमी घडत असल्याचे अनुभवावरून दिसून येते. संकटकाळात काही असमिाजिक तत्व गरजूंची फसवणूक करून पळून जातात तेव्हा माणसांवरचा विश्‍वास उडून जातो. याचा प्रत्यय शुक्रवारी हैद्राबादवरुन बिहारकडे निघालेल्या चार मजुर युवकांना आला.

अधिक वाचा : नराधमाला बाप म्हणावे की आजोबा? सावत्र बापाने केलेल्या बलात्कारातून मुलीची प्रसुती

"त्यांच्या' समोर पडला मोठा प्रश्‍न
लॉकडाउनच्या काळात चार मजूर बिहार येथील पाटण्याला घरी जात होते. आधी वाहनचालकाने पैश्‍यासाठी पाटणा येथे सोडून देतो म्हणून नागपूरपर्यंत पोहोचविले व नंतर उतरवून दिले अन्‌ं पळ काढला. नागपूरच्या ऑटो चालकाने मी गावी सोडून देतो म्हणून बळजबरीने ऑटोत बसण्यास सांगितले. या भागातील काहीच माहिती नसल्याने भीतीपोटी ते चौघे ऑटोत बसले. इकडे तिकडे फिरवून आणल्यानंतर चालकाने या युवकांकडून तीन हजार रूपये उकळले. आता पैसे संपल्याने करावे तरी काय, असा प्रश्न समोर असताना पोटात अन्नाचाही कण नव्हता. सोबत असलेले साहित्य डोक्‍यावर घेउन ते चालत असताना पारशिवनी गाठली. पैसे संपल्यावर आता काय करायचे तर पायदळ मोबाईलवर "मॅप' पाहत बिहारच्या दिशेने जात असता पारशिवनीला हे युवक उपाशी येताना दिसले. रस्ता विचारीत असताना एकाची प्रकृती खालावली होती.

अधिक वाचा :  पाऊस आला धावून, शेत गेले वाहून, मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान   

सामाजिक कार्यकर्ते आले धावून
त्यांची अवस्था पाहून स्थानिक युवकाने सामाजिक कार्यकर्त्यांना फोन करुन या युवकाची माहिती दिली. लागलीच त्या मजूर युवकांना पारशिवनी बस स्थानकावर आणले. विचारपुस केल्यावर त्यांनी सर्व हकीकत सांगितली. परिस्थिती पाहता त्यांना आधी अंधोळीकरीता पाणी दिले. इस्टमित्रांना या घटनेटी माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते जगदिश मोहड यांनी जेवणाची व्यवस्था केली. कुणी औषधी आणून दिली. रात्रीला त्यांना कुठे सोडायचे, हा प्रश्न असल्याने त्यांना बसस्थानकावरच झोपण्यासाठी जागा उपलब्ध करुन पिण्याच्या पाण्याची सोय करुन दिली. सकाळी पुन्हा त्यांच्या चहापाण्याची व जेवणाची सोय करुन देण्यात आली. आता पैसा नसल्याने त्यांना पाठवायचे कसे, तर या मार्गावरून पाटण्याकडे जाणारे वाहन शोधण्यात युवकांना यश आले. त्या चारही युवकांना बिहारच्या दिशेने रवाना करतेवेळी त्या युवकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
 
संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KCR कुटुंबात राजकीय भूकंप! माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीकडून नव्या पक्षाची घोषणा; निलंबनानंतर मोठा निर्णय, भावाची चिंता वाढली

Nagpur Accident : नागपूरमध्ये ‘हिट ॲण्ड रन’, ७२ वर्षीय योग शिक्षिकेला कारने चिरडले

Latest Marathi News Live Update : पुण्यातील मांजरीमध्ये सोसायटीतून चंदनाच्या झाडांची चोरी

Career Numerology : एक टर्निंग पॉइंट बदलतो 'या' ४ मुलांकाच्या महिलांचं नशीब; सरकारी अन् खाजगी क्षेत्रावर करतात राज, घेतात लाखात पगार

H-1B व्हिसावर येणार तीन वर्षांची बंदी? अमेरिकेतील खासदारांनी मांडलं विधेयक, नेमकी काय आहे तरतूद?

SCROLL FOR NEXT