Thieves stole Rs thirty lakh in Nagpur
Thieves stole Rs thirty lakh in Nagpur 
नागपूर

कुटुंबाला बसला तीस लाखांचा दणका; गोव्याला फिरायला जाणे पडले महागात

मंगेश गोमासे

नागपूर : एका कुटुंबाला गोव्याला फिरायला जाणे चांगलेच महागात पडले. चोरट्यांनी घरी कुणी नसल्याची संधी साधत कपाटात ठेवलेले हिरे, सोन्याचे दागिने व रोख ४७ हजार रुपये असा एकूण ३० लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमापुरम गुणशंकर रेड्डी (६१, रा. परफेक्ट हाउसिंग सोसायटी, पन्नासे ले-आउट) यांचा गोडाऊनचा व्यवसाय आहे. रेड्डी हे आपल्या कुटुंबासह तीन डिसेंबर रोजी घराला कुलूप लावून गोवा येथे गेले.

घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी आलमारीत ठेवलेले सोन्याचे दागिने, हिरे आणि रोख ४७ हजार रुपये असा एकूण ३० लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

गोव्याच्या टूरवरून मंगळवारला परत आलेल्या रेड्डी कुटुंबाला सामान अस्ताव्यस्त पाहून घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी आलमारी बघितली असता हिरे, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आढळून आली. एवढा मोठा मुद्देमाल चोरी झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला. सिमापुरम रेड्डी यांनी लगेच सोनेगाव पोलिसांत तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरी झालेल्या मुद्देमालाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली आहे. काही जणांची यात चौकशी झाल्याची माहिती आहे. घरावर पाळत ठेवणाऱ्यांनी हात साफ केला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT