Third wave of corona in Nagpur district Outbreak exacerbated this time Picture sakal
नागपूर

नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रकोप ओसरत असल्याचे चित्र

कोरोनामुळे पाच रुग्ण दगावले २,२११ बाधित, २,८३१ कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रकोप हळूहळू ओसरत असल्याचे चित्र असतानाच पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीसी वाढ झाली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येतील चढउतार प्रशासनसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र, बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचा टक्का वाढलेलाच आहे. गुरूवारी (ता.३)जिल्ह्यात २२११ जण कोरोनाबाधित आढळले तर २८३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.(Third wave of corona)

जिल्ह्यात मागील दोन दिवसात रुग्णसंख्या दोन हजारापेक्षा कमी नोंदविल्या गेली. परंतु गुरुवारी रुग्णसंख्येत वाढ होऊन ती २२११ वर पोहचली. ९ हजार ६७३ कोरोनाच्या चाचणी झाल्या आहेत. यात शहरातील १३५१ तर ग्रामीण भागातील ७७१आणि ८९ जिल्ह्याबाहेरचे कोरोनाबाधित आढळले. जिल्ह्यात २३ महिन्यांमध्ये ५ लाख ६७ हजार २२६ वर आकडा पोहचला आहे. दिवसभरात शहरातुन ४ व ग्रामीणमधिल १ अशा ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या १० हजार २७० वर पोहचली आहे. सध्यस्थितीत कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढल्याने शहरात ११ हजार ५५५, ग्रामीणमध्ये ५७२७ व जिल्ह्याबाहेरील २४७ असे १७ हजार ५२९ सक्रिय कोरोनाबाधित शिल्लक आहेत. यापैकी केवळ १५.७ टक्के म्हणजेच २ हजार ७६२ जण मेयो, मेडिकलसह इतर शासकीय व खासगी रुग्णालयांत डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. तर लक्षणे नसलेले १४ हजार ७६७ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

दोन महिन्यापुर्वी ९७ टक्क्यांपलिकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण होते. परंतु तिसऱ्या लाटेत बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर आले होते. आता पुन्हा बाधितांची संख्या घटून कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढले आणि बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहचले आहे. आज दिवसभरात शहरातून २ हजार ०२३, ग्रामीणमधून ७५५ व जिल्ह्याबाहेरील ५३ असे २ हजार ८३१ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे एकूण कोरोनामुक्तांची संख्या ५ लाक ३९ हजार ४२७ वर पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा; NIAने सांगितलं बैसरन खोऱ्यालाच का केलं गेलं लक्ष्य?

Ganpati Visarjan Tragedy: कोकणात गणपती विसर्जनावेळी तीनजण जगबुडी नदीत गेले वाहून, मात्र...

Mumbai News: आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला, जरांगे यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

अल्पसंख्य सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश, वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘डीजेमुक्त सोलापूर’साठी शाळकरी मुली उतरल्या रस्त्यावर! अभ्यास, आरोग्य, पर्यावरणावर डीजेचा दुष्परिणाम, डीजेची दहशत थांबविण्याची मागणी

SCROLL FOR NEXT