Those two sisters died of starvation Nagpur crime news 
नागपूर

सत्य आले समोर; ‘त्या’ दोन बहिणींचा मृत्यू भुकेच्या व्याकुळतेनेच

सतीश दहाट

कामठी (जि. नागपूर) : दाळ ओळी नंबर २ येथील एका बंद घरात दोन सख्या बहिणीचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले होते. त्या दोघींचा मृत्यू भुकेने व्याकूळ झाल्यानेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालामध्ये नमूद केले आहे. दोन सख्या बहिणीचे कुजलेले मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा शहरात चर्चेचा विषय ठरला होता. या घटनेमुळे शहरात मात्र खळबळ उडाली होती.

जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाल ओळी नंबर २ येथील एका बंद घरात कामठी नगर परिषदेचे कर्मचारी घर कराची डिमांड पावती देण्यासाठी घरी गेला असता घर बंद असल्याने शेजाऱ्याला विचारपूस केली असता शेजाऱ्यांनी दाराच्या आतून पावती खाली टाकण्यास सांगितले. कर्मचारी पावती घरात टाकण्यात गेला असता त्याला घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी नागरिकांना सांगितले.

पोलिसांनी दार उघडले असता पलंगावर कल्पना नागोराव लवटे (५०), पलंगाच्या खाली जमिनीवर पद्मा नागोराव लवटे (६०) या दोघींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आले होते. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शव विच्छेदन अहवाल आल्यानंतर उघड होणार असले तरी भुकेने व्याकूळ झाल्याने यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता.

पोलिस उपनिरीक्षक एस. जी. पाटील हे या प्रकरणाचा तपास करीत होते. दोन्ही मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून, भुकेने व्याकूळ झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

शेजारी व इतर कोणाशी त्यांचा संबंध नव्हता

दोन्ही कुजलेल्या मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले होते. शेजाऱ्यांकडून माहिती घेतली असता पद्मा व कल्पना या दोघी सख्या बहिणी असून, उच्चशिक्षित होत्या. दहा वर्षांपूर्वी त्यांचे आई-वडील मरण पावले होते. त्यानंतर त्यांनी धुनीभांडी व मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होत्या. परिस्थिती हलाखीची असताना शेजारी व इतर कोणत्याही नातेवाइकांकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता दोन्ही बहिणी घराचे दार बंद करून घरात राहत होत्या. शेजारी व इतर कोणाशी त्यांचा संबंध नव्हता.

धाकट्या बहिणींचे बयाण

मृत पद्मा व कल्पनाच्या धाकट्या बहिणी सुनिता नरेंद्र कंटाळे (वय ३५, रा. इंदोर मध्यप्रदेश), अर्चना विजय इल्लपुरकर (वय ४०, रा. बुलढाणा) या कामठी उपजिल्हा रुग्णालयात हजर झाल्या होत्या. त्यांना ठाणेदार विजय मालचे यांनी पद्मा व कल्पना संदर्भात माहिती विचारली असता कल्पना थोडी मानसिक रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले होते. पद्मा उच्चशिक्षित होती. मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीरकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT