thousands of people present in marriage ceremony even in corona time in saoner of nagpur 
नागपूर

आता यांना कोण सांगणार? कोरोना काळातही लग्नाला हजारो पाहुणे

सकाळ वृत्तसेवा

सावनेर (जि. नागपूर) : खानगाव रोडवरील आशीर्वाद सभागृहात राज्य सरकार आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून हजारोंच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. या प्रकरणाने सावनेर तहसील प्रशासन, नगर परिषद प्रशासन आणि पोलिस विभाग यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

दुसऱ्या टप्प्यात वाढत्या कोरोना संक्रमणास सामोरे जाण्यासाठी मंत्री, जिल्हा दंडाधिकारी या गोष्टीकडे विशेष लक्ष देत गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी सभागृहातील सर्व विवाह आणि इतर कार्यक्रमांना पूर्णत: बंदी घालूनही स्थानिक रहिवाशांनी मुलीचे लग्न थाटात केल्याची बाब उघडकीस आली आहे. 

अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचा कसा फायदा घेतला जातो, हे सावनेरमध्ये शासनाच्या आदेशाला डावलून झालेल्या लग्नसोहळयावरून लक्षात येते. संबंधित व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित असल्याचे बोलले जाते. याच ओळखीचा फायदा घेत मुलीचे लग्न हजारोंच्या उपस्थितीत पार पाडले. मात्र, सावनेर नगर पालिका, पोलिस प्रशासनाला याची माहिती असूनही कारवाई करण्यास उशीर लावल्याने कर्मचारी वर्गात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनंतर पालिका प्रशासनाने आशीर्वाद हॉलच्या मालकावर १७ हजार ५०० रूपयाचा दंड ठोठावला व त्यांना सात दिवस सभागृह बंद ठेवावे, यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT