three-and half year old child killed in car accident near santra market accused driver abscond  Sakal
नागपूर

Nagpur News : साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला भरधाव कारने घरासमोर चिरडले; संत्रा मार्केटजवळील घटना; आरोपी चालक फरार

संत्रा मार्केटवरील रस्त्यावर असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : घरासमोर खेळणाऱ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला भरधाव कार चालकाने धडक देऊन चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक फरार झाला. ही घटना संत्रा मार्केट परिसरातील चांदशाह दर्गाजवळ घडली. आदी चंकू मालाकार असे मृत मुलाचे नाव आहे. गणेशपेठ पोलिसांनी आदीचे नातेवाईक गच्छाली संजित मालाकार यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला.

गच्छाली आणि आदीचे कुटुंब हे मुळचे चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. दोन महिन्यांपूर्वी मजुरीसाठी दोन्ही कुटुंब नागपुरात आले. संत्रा मार्केट रोडवर रामझुल्याशेजारी चांदशाह दर्गाजवळ झोपडी बनवून राहू लागले. रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास गच्छालीच्या मावशीचा मुलगा आदी खेळत-खेळत झोपडीतून बाहेर रस्त्यावर आला.

त्याच दरम्यान पांढऱ्या कारच्या चालकाने त्याला चिरडले आणि चालक फरार झाला. गंभीर जखमी अवस्थेत कुटुंबीय आदीला मेयो रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी अज्ञात कार चालकावर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. डोळ्यासमोरच ही घटना घडली. मालाकार कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. कार चालक महिला असल्याची चर्चा परिसरात आहे.

अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मिळालेल्या माहितीनुसार, संत्रा मार्केटवरील रस्त्यावर असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला. कारचालकाने अपघात होताच मागे वळून बघितले आणि कार भरधाव पळवली. मृत मुलाचे वडील कामाच्या शोधात ओडिशा राज्यात असून त्यांना मुलाच्या मृत्यूची सूचना दिली असून ते परतीच्या प्रवासात असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT