coronavirus 
नागपूर

तीन कोरोनाबाधित ठणठणीत होऊन परतले घरी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एकिकडे उपराजधानीत कोरोनाचा वाढता संसर्ग चिंताजनक असताना उपचारातून बरे होऊन कोरोनाबाधित घरी जात आहेत, ही दिलासा देणारी बाब आहे. आतापर्यंत 8 जण घरी परतले आहेत. यात पुन्हा तिघांची भर पडली असून मंगळवारी रात्री उशीरा जरिपटका येथील 3 बाधित रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले. विशेष असे की, कोरोनावर एका पक्षघात असलेल्या व्यक्तीने मात केली.
कोरोनाच्या धास्तीने उपराजधानी चिंताग्रस्त आहे. मात्र मंगळवारी मनाला समाधान देणारी एक घटना घडली. खामला येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 3 बाधितांना 20 दिवसांच्या उपचारानंतर ठणठणीत झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे करोनावर यशस्वीरित्या मात करणाऱ्या नागपुरातील रुग्णांची संख्या आता 11 झाली आहे. 11 मार्च रोजी नागपुरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत बाधितांचा आकडा 56 वर पोहोचला आहे. यातील 11 जण बरे झाले आहेत. तर 45 जणांवर मेयो आणि मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. एकाच दिवशी 3 बाधितांनी कोरोनावर मात केल्यानंतर इतरही बाधितांना बळ मिळत असल्याचे डॉक्‍टर सांगतात. बाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर उपचारानंतर घशातील स्त्रावाचे दर आठ दिवसानी नमुने घेऊन त्याची चाचणी केली गेली. यात त्याच्या तीनही चाचण्या निगेटिव्ह आल्या. यामुळेच मेडिकलमधून सुटी देऊन घरी पाठविण्यात आले.

कोरोनाशी लढताना ते जिंकले

मेडिकलचा कोरोना वॉर्ड म्हणजे पेईंग वॉर्ड आहे. येथे कोरोनाबाधितांवर योग्य उपचार सुरू आहेत. यामुळेच कोरोनाची प्रचंड दहशत पसरली असताना उपराजधानीत कोरोनाच्या बाधेमुळे दाखल झालेले रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. विशेष असे की, डेंजर झोन मध्ये असलेला पक्षघात झालेला कोरोनाबाधित बरा झाला आहे, ही समाधानकारक बाब आहे. वीस दिवसात 11 जण मेडिकल आणि मेयोतून बरे होऊन गेले. कोरोना वॉर्डातून बाहेर निघताना त्या तिघांसाठी वॉर्डातील डॉक्‍टर, परिचारिका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. डॉक्‍टर, परिचारिकांचे आभार मानत असताना रुग्णांच्या डोळ्यातून पाणी आले. यावेळी टाळ्या वाजवून त्यांचे मनोबल वाढवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Kulwant Khejroliya? वेटर ते IPL 2026... कुलवंतला मोठ्या सामन्यात GT ने दिली संधी, माजी खेळाडूलाच RCB विरुद्ध उतरवले...

Sagargad History : सागरगडावर लागला प्राचीन विहिरीचा शोध; छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गडावरील 'ती' जागा पाहून दुर्गप्रेमीही थक्क...

LPG New Rule: मोठा दिलासा! घरगुती गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये झाले बदल

Mumbai Bakari Eid Market : गेल्या काही दशकांतील सर्वात महागडी ईद! बोकडांच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री; पाहा देवनारमधील सद्यस्थिती

'टायटन'ची कथा 'मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! नसिरुद्दीन शाह साकारणार JRD Tata

SCROLL FOR NEXT