three members of the same family committed suicide In Nagpur 
नागपूर

मन सुन्न करणारी घटना : आई-वडिलांनी टोकाच्या निर्णयात मुलीलाही घेतले सोबत; जड मनाने घेतली नदीत उडी

योगेश बरवड

कुही (जि. नागपूर) : तालुक्यातील आंभोरा येथे नागपुरातील वाठोडा येथील एकाच कुटुंबातील तिघांनी वैनगंगा नदीत आत्महत्या केली. रविवारी दुपारी मन सुन्न करणारी ही घटना उघडकीस आली. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी घटनेचे वृत्त येऊन धडकताच वाठोड्यात शोककळा पसरली. श्याम गजानन नारनवरे (वय ४६), सविता श्याम नारनवरे (वय ३५) व समता श्याम नारनवरे (वय १२) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठोडा येथील अनमोलनगरच्या हनुमान मंदिरमागे कल्पना सारवे यांच्याकडे नारनवरे कुटूंब भाड्याने राहत होते. श्याम नारनवरे गंजीपेठेतील संताजी जगनाडे महाराज को-ऑपरेटिव्ह बँकेत कामाला होते. पत्नी सविता गृहिणी तर मुलगी समता इयत्ता सहावीची विद्यार्थिनी होती. शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावून ते बाहेर गेले होते. तेव्हापासून घरी परतलेच नाहीत.

रविवारी कुही तालुक्यातील आंभोरा शिवारात येथील वैनगंगा नदीत रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एकाच भागात तिघांचेही मृतदेह तरंगताना दिसले. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे नागरिक तेथे दाखल झाले. बातमी जिकडे तिकडे वाऱ्यासारखी पसरली. ठाणेदार आनंद कविराज यांच्यासह संजय पायक, स्वाती लोखंडे, दीपक ढोले, अनिल मांढळे, अशापाक शेख, प्रदीप खिल्लारे घटनास्थळी पोहोचले.

नावाड्यांच्या साहाय्याने तिन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी कुही येथे पाठविण्यात आले. त्यांच्याकडे आढळलेल्या कागदपत्रांवरून या तिघांची ओळख पटली. पोलिसांनी तातडीने नातेवाईकांशी संपर्क साधून बोलावून घेतले. नारनवरे कुटुंबीय फारसे कुणाशी मिसळत नव्हते.

काही दिवसांपासून तणावात असल्याचे बोलले जाते. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. ज्योती संजय घरत (३२) यांच्या सूचनेवरून वेलतूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पीएसआय किशोरकुमार वैरागडे पुढील तपास करीत आहेत.

आर्थिक विवंचनेतून घेतला टोकाचा निर्णय

नारनवरे कुटुंबाने आत्महत्या कर्जबाजारीपणातून केल्याची चर्चा आहे. श्याम नारनवरे गंजीपेठेतील संताजी जगनाडे महाराज को-ऑपरेटिव्ह बँकेत कामाला होते. त्यांच्याकडून बॅंकेची दोन लाखांची रक्कम खर्च झाली होती. त्यांना अल्प मोबदला मिळत असल्यामुळे पैशाची परतफेड शक्य होत नव्हती. कोरोना लॉकडाऊननंतर त्यांची आर्थिक स्थिती ढासळत गेली. या आर्थिक विवंचनेतून नारनवरे कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: टीम इंडिया कोणत्या Playing XI सह मैदानावर उतरणार? प्रशिक्षकाने दिली महत्त्वाची हिंट...

Pune University : विद्यापीठाच्या आदेशाची अवहेलना; वार्षिक अहवालासाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Rohit Sharma Video : रोहित शर्मा मध्यरात्री कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये; कारण काय? Viral Video ने वाढवली चाहत्यांची धडधड

Latest Marathi News Updates: उपराष्ट्रपती पदासाठी मतदान सुरु, पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Explained: औषधांशिवाय रक्तवाहिन्या निरोगी ठेवायच्या आहेत? हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' 4 सोपे उपाय

SCROLL FOR NEXT