three People Steal Luxury Car Of A Man In Nagpur 
नागपूर

हे राम... हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर भक्ताला लघुशंका करणे भोवले, वाचा सविस्तर

योगेश बरवड

नागपूर : शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. कधी हत्या तर कधी लूट अशा घटनांनी नागपूर अक्षरशः हादरून गेले आहे. खून तर नित्याचेच झाले आहेत. म्हणूनच शहराला क्रईम कॅपील असे नाव पडले आहे. यात भर म्हणजे हनुमानाच्या दर्शनासाठी गेलेल्या एका भाविकाने पैसे देण्यास नकार दिला म्हणून काही गुंडांनी धक्कादायक कृत्य केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाराम रामदास पोलोलू (६१, रा. नाईकनगर, मानेवाडा रोड) हे गुरुवारी एसक्रॉस कारने डुंडा मारोती देवस्थान येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून दुपारी ते परतीच्या प्रवासाली निघाले. बेलतरोडी हद्यीत वेळाहरी गावासमोरील सर्विस रोडवरील बसस्टॉपपासून पाचशे मीटर समोर केंद्रीय प्रोव्हिजन शाळेजवळील नाल्याजवळ ते लघुशंकेसाठी थांबले.

लघुशंका झाल्यानंतर परत गाडीत बसत असताना ३० ते ३५ वर्ष वयोगटातील तीन अज्ञात आरोपी मोटारसायकलवरून त्यांच्याजवळ आले. त्यांनी आपले वाहन कारसमोर आडवे केले. ‘भोले के प्रसाद के लिये पैसे दो' असे म्हणत पैशांची मागणी केली. त्यांच्याकडे दुर्लक्षकरीत पोलालू कारमध्ये बसू लागले. त्याचवेळी आरोपीपैकी एकाने पोलोलू यांच्यावर चाकू उगारला. धाक दाखवित त्यांना ढकलून कार घेऊन पळून गेले.

कसेबसे पोहोचले ठाण्यात

तीन लुटारूंनी चाकूच्या धाकावर ११ लाखांची लक्झरी कार पळवून नेली. पोलोलू यांनी कसेबसे बेलतरोडी ठाणे गाठून तक्रर दिली. त्या आधारे पोलिसांनी दुखापत व जबरी चोरीता गुन्हा नोंदवित आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी तपासचक्र वेगात फिरवित सहा तासांतच कुख्यात सोनू खानसह तिन्ही लुटारूंच्या मुसक्या आवळल्या. कारमध्ये सॅमसंग कंपनीचा मोबाईल तसेच चिल्लर आणि नोट असे दीड हजार रुपये होते.

एक एक धागा जोडत आवळल्या मुसक्या

तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपीच्या शोधार्थ पाठविली. पोलालू यांनी सांगितलेल्या वर्णनावरून आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. खबऱ्यांना सक्रिय करण्यासह नागरिकांकडे चौकशी करण्यात आली. एक एक धागा जोडत पोलिसांनी तिन्ही आरोपिंच्या मुसक्या आवळल्या.

आरोपी सराईत गुन्हेगार

तिन्ही आरोपी पोलिस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सोनू खान महबूब खान (३२, रा. यासिन प्लॉट, उमरेड रोड, मोठा ताजबाग), शेख हमिद शेख बब्बू (३८, रा. ताज अम्मा कॉलनी, बडा सरायजवळ, मोठा ताजबाग) व सचिन नारायणराव पारधी (३४, रा. प्रभातनगर, नरसाळा) अशी आरोपींची नवे आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT