Throwing petrol, the bike caught fire in Nagpur 
नागपूर

पेट्रोल टाकून दुचाकी पेटवली; चौघांचा युवकावर प्राणघातक हल्ला

अनिल कांबळे

नागपूर : वस्तीतील वर्चस्वाच्या वादातून चार युवकांनी तलवारीने एकावर हल्ला केला. त्या तरुणाने त्यांचा वार चुकविला आणि दुचाकी सोडून पळ काढला. आरोपींनी युवकाची बाईक पेट्रोल ओतून जाळली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी राहुल विनायक वालदे (२६, रा. संजयनगर, डिप्टी सिग्नल) याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये मोनू, राहुल, टिपू आणि इतरांचा समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींचे राहुलशी जुने भांडण आहे. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास राहुलचा साळा संजय सतोखिया हा घरी जात होता. त्यावेळी आरोपींनी संजयला रस्त्यात अडवून शिवीगाळ करीत धमकी दिली होती. या घटनेच्या काही वेळानंतर राहुल हा दुचाकीने पुंजारामवाडी परिसरातील दारूच्या दुकानात गेला. यावेळी आरोपीही तेथे आले.

पार्किंगमध्ये असतानाच आरोपींनी राहुलला पाहिले. ते तलवार आणि कोयत्यासारखे शस्त्र घेऊन त्याला मारण्यासाठी धावले. कोयत्याने राहुलवर वारही केला. मात्र, तो वार राहुलने चुकवल्याने बाईकला लागला. घाबरलेल्या राहुलने बाईक तेथेच सोडून पळ काढला. राहुल पळाल्याचा राग आरोपींनी त्याच्या वाहनावर काढला.

दुचाकीवर शस्त्रांनी अनेक वार केल्यानंतर पेट्रोल टाकून आग लावली. आरोपींनी बारच्या भिंतीवर आणि गेटवरही तलवारीने वार केले आणि फरार झाले. राहुलने घटनेची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT