नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागातील तळोधी वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालून तिघांचे बळी घेणाऱ्या एनटी-1 वाघाला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फक्त पावणे दोन तासात जेरबंद केले. या वाघाला जेरबंद करण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांना रविवारी सकाळी मुख्य वनसंरक्षकांनी मागितली. रविवारची सुटी आणि वन मुख्यालयात कोरोनाबाधित रुग्ण आढळला असला तरी कर्तव्याला प्राधान्य देत नितीन काकोडकरसह इतरही वनाधिकारी कार्यालयात हजर झाले. सव्वा तीन वाजता वाघाला जेरबंद करण्याची परवानगी व्हॉटसऍपवर मुख्य वनसंरक्षकांना पाठवण्यात आली. त्यानंतर अवघ्या पावणेदोन तासांत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिताफीने वाघाला जेरबंद केले.
यवतमाळ जिल्ह्यातील अवनी या वाघिणीला मारण्यासाठी व्यावसायिक शिकाऱ्याला बोलवून वनाधिकाऱ्यांवर अविश्वास दाखविणाऱ्या तत्कालीन सरकारच्या निर्णयाला यानिमित्ताने पुन्हा एक चपराक बसली आहे. या वाघिणीला ठार मारण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना पांढरकवडा येथे शिबिर कार्यालय करण्याचे निर्देश दिले. त्यात जोपर्यंत वाघीण ठार होणार नाही तोपर्यंत शिबिर कार्यालय सोडू नये असे म्हटले होते. या निर्णयामुळे वनाधिकाऱ्यांचे मनोबल खचले होते. परिणामी, अवनी वाघिणीला जेरबंद अथवा मारण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांवर दबाव वाढला होता. या वाघिणीच्या निमित्ताने वनविभाग वन्यजीव प्रेमी आणि स्वयंसेवी संस्थेच्या रडारवर आला.
आनंदाची बातमी : निओवाईस धूमकेतू पाहण्याचा दुर्मिळ योग
काही न्यायालयाचे दरवाजे ठोठावले अजूनही त्या प्रकरणी वनाधिकारी न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. वनाधिकाऱ्यांवर विश्वास दाखविल्यानेच यंदा आतापर्यंत चार वाघांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. हे विशेष. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथून आणलेला वाघ गोरेवाड वन्यप्राणी बचाव केंद्रात आणण्यात आले आहे. कोरोनाच्या आणिबाणीच्या काळात त्याला 14 दिवस विलगिकरणात ठेवण्यात आले आहे.
वाघाचे पिंजरे हाऊसफुल्ल
गोरेवाड्यात आणलेल्या एनटी 1 वाघाची प्राथमिक तपासणी केली. वाघाची प्रकृत्ती उत्तम असून तंदुरुस्त आहे. या वाघाची ओळख व्हावी म्हणून उपचार पिंजऱ्यात मायक्रोचिप लावण्यात आली. वाघाचे रक्त व रक्तजल नमुने तातडीने तपासण्यात आले. या वाघाला डॉ. शिरीष उपाध्ये व वन्यप्राणी संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या चमूच्या पाहणीत विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. डॉ. भाग्यश्री भदाणे, डॉ. सुजित कोलंगथ, डॉ. शालिनी ए. एस. व डॉ. मयूर पावशे यांनी वाघाची तपासणी केली. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक एच. व्ही. माडभुषी, वन परिक्षेत्र अधिकारी आर. पी. भिवगडे, आर. डी. वलथरे, हरीश किनकर, आर. एच. वाघाडे, पी. सी. पाटराबे हे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.