नागपूर

पेट्रोल शंभरीच्या दिशेने; निकालानंतर सात दिवसांपासून सतत वाढ

राजेश रामपूरकर

नागपूर : पाच राज्यांच्या निवडणुकांच्या काळात स्थिर असलेले इंधनाचे दर (Fuel rates) निकालानंतर सात दिवसांपासून सतत वाढत आहे. पेट्रोलची (Petrol) वाटचाल शंभरीच्या दिशेने सुरू झाली आहे. ४ मेपासून सलग सात दिवसांच्या दरवाढीनंतर पेट्रोलचा दर हा ९८.२४ पैसे आणि डिझेल (Diesel) दर ८८.२९ पैसे प्रतिलिटर झाले आहे. (Towards petrol hundred)

सात दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १ रुपया ४० पैसे वाढ झाली. तर डिझेलच्या दरात १.४२ पैसे वाढ झाली होती. शहरांमध्ये काल पेट्रोलच्या दरात २४ पैसे तर डिझेलच्या दरात २६ पैशांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारीनंतर मेमध्ये पुन्हा एकदा इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक स्तरावर लसीकरण मोहिमेसह अन्य कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमजोर होत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

दररोज नवे दर

दररोज सकाळी सहाच्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाइटने काल पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीचा परिणाम सर्वांवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या किमतीवर असते.

टाळेबंदीमुळे पेट्रोल पंप सकाळी ७ ते सांयकाळी ७ पर्यंत सुरू असतात. इंधनाच्या दरात सतत वाढ होत असून विक्रीही कमी झालेली आहे.
- चंद्रशेखर जोशी, माजी कोषाध्यक्ष, विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन

तारीख - पेट्रोल - डिझेल

6 मे - 97.38 - 87.56

7 मे - 97.69 - 87.63

10 मे - 97.74 - 87.76

11 मे - 98.00 - 88.03

12 मे - 98.24 - 88.2९

(Towards petrol hundred)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT